Jalgaon Accident News : सुसाट कारची दुचाकीला धडक; गर्भवतीचा मृत्यू

Jalgaon Accident : एरंडोल येथून नातेवाइकांना भेटून घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार दांपत्याला भरधाव वाहनाने धडक दिली.
accident news
Accident Newsesakal

Jalgoan Accident News : एरंडोल येथून नातेवाइकांना भेटून घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार दांपत्याला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघात दीपाली योगेश कोळी (वय २२, रा. जुना असोदा रोड) या आठ महिन्यांच्या गर्भवतीमातेचा बाळासह जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती व चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी वराड गावाजवळ घडली. जागतिक मातृदिनी आईसह बाळाचा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ()

योगेश गुलाब कोळी (वय २८) खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहे. रविवारी ते पत्नी दीपाली व चार वर्षांची मुलगी काव्या हिला घेऊन एरंडोल येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच १९, सीएफ ९७९७) वराडजवळ दुचाकीस्वार दांपत्याला जोरदार धडक दिली.

accident news
Jalgoan Crime News : घरफोड्या करणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश; घरफोडीच्या पैशांवर कार, प्लॉट खरेदी

या अपघातात आठ महिन्याची गर्भवती असलेल्या दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती योगेश व मुलगी काव्या गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुर्दम्य योगायोग

निमगव्हाण रूपाली यांचे माहेर. माहेरी आईवडिलांची धावती भेट घेत हे दांपत्य सायंकाळी आपल्या घरी जळगावला परत येण्यासाठी निघाले होते. जागतिक मातृदिनी दीपाली या मातेचा पोटातील बाळासह मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह नातेवाइकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

accident news
Jalgoan Crime News: असभ्य कृत्य करण्यासाठी आकारले जात होते पैसे; अनधिकृत कॅफे चालविणारे दोघे ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com