
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी केली जात आहे. नाकाबंदीत तहसील कार्यालयाच्या परिसरातील वाहनांची तपासणी करण्यात आली. या वेळी दोन वाहनांमधून दोन लाख २३ हजारांची रोकड, तर बहिणाबाई चौकात ८५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक अनिल भवारे व कल्याणी वर्मा, उपनिरीक्षक महेश घायतड, राजू जाधव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली. (Cash seizure of 152 lakhs blockade in city in view of assembly elections )