Jalgaon News : भवानी मंदिराचा यंदा शताब्दी वर्ष महोत्सव; जिर्णोद्धाराला 100 वर्षे पूर्ण

Jalgaon : सुभाष चौक, सराफ बाजारातील आई भवानी व महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धाराला १०० वर्षे झाल्याने जिर्णोद्धार शताब्दी वर्ष परिपूर्णता वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
Decorations on Bhavani Temple in Saraf Bazar. Goddess idol in the temple.
Decorations on Bhavani Temple in Saraf Bazar. Goddess idol in the temple.esakal

Jalgaon News : सुभाष चौक, सराफ बाजारातील आई भवानी व महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धाराला १०० वर्षे झाल्याने जिर्णोद्धार शताब्दी वर्ष परिपूर्णता वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. गुरुपुष्यामृत योगावर १०१ व्या वर्षात मंदिराने पदार्पण केले.

शंभर वर्षांपूर्वी हल्लीचे संपूर्ण सागवानी व पितळी गजाने साकारलेले मंदिर त्याकाळी १३ हजार १७१ रुपये ९ आणे ९ पै एवढ्या रकमेत तत्कालीन व्यवस्थापक स्व.शंकरलाल आबोटी याचे पुढाकाराने बांधल्याचे ताम्रपट मंदिरात असून ताम्रपटावर सर्व देणगीदारांची नावे कोरलेली आहे. (Centenary year festival of Bhavani temple)

शताब्दी पूर्णता वर्धापन दिनानिमित्त मंदिराची स्वच्छता फुलांचे तोरणे रांगोळ्यांनी सजावट करून आज सकाळी ८ वाजता गणपती, कलश पूजन, पुण्याहवाचन द्वार व वास्तु स्थान व पंचवटी पुजन. ध्वजारोहण, महाआरती श्रीकांत व सुधा खटोड यांचे हस्ते संपन्न होऊन प्रसाद वितरण करण्यात आले. या प्रसंगी भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. तर पुजेचे आचार्य पंडीत महेद्र शर्मा हे होते.

शताब्दी वर्ष साजरे होणार

हे वर्ष हे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करुन पूर्णता महोत्सव साजरा केला जाणार आहे. या वर्षात अनेक भव्य व दिव्य धार्मिक अनुष्ठानांचा आयोजन केले आहे. यात १३ मार्चला श्रीगणेश याग, २१ ते २३ एप्रिल श्री रुद्र हनुमान यज्ञ.

Decorations on Bhavani Temple in Saraf Bazar. Goddess idol in the temple.
Jalgaon News : ग्राहकांनी वाळूची मागणी अशी नोंदवावी

१९ ते २३ ऑगस्ट श्री महारुद्राभिषेक व रुद्र याग, १३ ते १५ डिसेंबर श्री गुरूदत्त पारायण व दत्त याग, श्री शतचंडी महायज्ञ तसेच श्री महालक्ष्मी यज्ञाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. प्रत्येक यज्ञावेळी सामूहिक भंडारा होणार आहे.

तसेच संपूर्ण वर्ष भर पौर्णिमेस श्री सत्यनारायण पूजा, दर शुक्रवारी महाआरती, भजन, कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमांची विविध अनुष्ठानाची पर्वणीच भक्तांना लाभणार आहे. शताब्दीवर्ष वर्धापन महोत्सवास प्रमुख आचार्य पं. महेश त्रिपाठी व पं. राजाभाऊ जोशी याचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन किसनलाल पुरोहित, श्रीराम खटोड, श्रीकांत खटोड, राजु बांगर, मनिष अग्रवाल, चंदन अबोटी, विश्वनाथ अग्रवाल, गोपाल पाटील यांनी केले आहे.

Decorations on Bhavani Temple in Saraf Bazar. Goddess idol in the temple.
Jalgaon News : शासकीय डेपोतून 1 लाख ब्रास वाळू उपलब्ध होणार; 600 रुपये दर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com