
अमळनेर : शहरातील विविध भागांत डेंगी व विषारी मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याने नगरपालिकेची आरोग्यव्यवस्था खडबडून जागी झाली आहे. नगरपालिकेकडून उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात कीटकशासकाची धूरफवारणी करण्यात येत असून, आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. (Jalgaon Challenge to prevent dengue in Amalner)