जळगाव शहरात दुसऱ्यांदा सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर

दिलासादायक; दिवाळीच्या दिवसांतही संसर्ग अद्याप नियंत्रणात
Corona Patients
Corona PatientsSakal media
Updated on: 

जळगाव : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्या त्या गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून देशात हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात दुसऱ्या लाटेनंतर आता दुसऱ्यांदा सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. तर दुसरीकडे ऐन दिवाळीतही नव्याने बाधित रुग्ण क्वचितच समोर आल्याने या दिलासादायक स्थितीमुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी २८ मार्चला पहिला कोरोनाचा रुग्ण जळगाव शहरात आढळून आला. लगेच दुसऱ्या दिवशी २९ मार्चला दुसरा रुग्ण समोर आला. पैकी एकाचा मृत्यू होऊन एक रुग्ण एप्रिलच्या १७ तारखेपर्यंत बराही झाला. मात्र एप्रिलच्या अखेरीस पुन्हा रुग्ण सापडू लागले व जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला. पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर फेब्रुवारी २०२१मध्ये जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झाली. या दोन्ही लाटांमध्ये जळगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते.

Corona Patients
मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वीच अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या...

दीर्घकाळानंतर दिलासा

जिल्ह्यात हॉटस्पॉट बनलेल्या जळगाव शहरात आतापर्यंत सर्वाधिक ३२ हजार ९८३ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३२ हजार ४१० रुग्ण बरे झाले आहे. तर सर्वाधिक ५७३ मृत्यूही जळगाव शहरातीलच आहेत. या आकड्यांमध्ये गेल्या दोन- तीन महिन्यांत मोठा दिलासा मिळाला. रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने कमी होऊन आता पूर्ण नियंत्रणात आली आहे. गेल्या महिन्यात नवरात्रोत्सवाच्या आधी तब्बल ७ महिन्यानंतर जळगाव शहरात एकही सक्रिय रुग्ण राहिला नाही. मात्र, दीर्घकाळानंतर मिळालेला हा दिलासा फार काळ टिकला नाही. तीन दिवस शून्य रुग्णसंख्येनंतर शहरात पुन्हा एखाद- दुसरा रुग्ण समोर आला आणि सक्रिय रुग्णसंख्या ५ वर गेली.

दुसऱ्यांदा शून्य रुग्ण

गणेशोत्सवामुळे रुग्ण वाढतील, अशी भीती होती. मात्र, रुग्ण वाढले नाहीत. नवरात्रोत्सव व दिवाळीतही तशी भीती व्यक्त होत होती. नवरात्रोत्सवानंतरच्या दिवसांत रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली. आता दिवाळीनंतरची स्थित अद्याप स्पष्ट व्हायची आहे. मात्र, सोमवारी जळगाव शहरातील उरले सुरले दोन रुग्णही बरे झाल्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे प्रशासनाने दिवाळीचा फीवर गेल्यानंतर चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. दिवाळीच्या दिवसांत दररोजच्या दोन-तीनशे चाचण्या होत होत्या. सोमवारी त्या वाढून हजारावर गेल्या आहेत. तरीही गेल्या दोन- तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकही रुग्ण समोर आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com