Jalgaon News : दहावीच्या मुलाने मामाच्या घरी गळफास घेत संपवलं जीवन

Jalgaon News : बाळद (ता.पाचोरा) येथील स्वप्निल पाटील हा विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता.
Death
Deathesakal

Jalgaon News : उन्हाळी सुट्यात मामाच्या घरी आलेल्या दहावीच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार (१०) कुसुंबा येथे घडली. स्वप्नील दीपक पाटील (१५, रा. बाळद, ता. पाचोरा) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. (Class 10 boy took extreme step news)

बाळद (ता.पाचोरा) येथील स्वप्निल पाटील हा विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता. काल शुक्रवारी (ता.१०) मे सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील खोलीत गेला.

दुपारी एकच्या सुमारास त्याची आजी त्याला बोलवायला गेली असता खोलीचे दार आतून बंद होते. दार उघडत का नाही म्हणून आजीने आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांनी धाव घेत दरवाजा तोडला. तेव्हा, स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. (latest marathi news)

Death
Yavatmal Crime : उमरखेड येथील युवकाचा मृत्यू संशयास्पद;अनाथ दत्ताच्या मारेकऱ्याला गजाआड करण्याची मागणी

तत्काळ त्याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती स्वप्नील याला मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Death
Akola Crime : चौहट्टाचा गुटखा किंग गजाआड ; ७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त,दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com