Jalgaon District Collector : मतदार स्लीपवाटप 7 मेपर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी प्रसाद

Jalgaon : जिल्ह्यात मतदार स्लीप वाटपाचे काम बीएलओेंकडे दिले आहे. ते काम २३ टक्के झाले आहे. ते काम ७ मेपर्यंत पूर्ण करावे, अशा सक्त सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘सकाळ’ला दिली.
Collector Ayush Prasad
Collector Ayush Prasadesakal

Jalgaon News : जिल्ह्यात मतदार स्लीप वाटपाचे काम बीएलओेंकडे दिले आहे. ते काम २३ टक्के झाले आहे. ते काम ७ मेपर्यंत पूर्ण करावे, अशा सक्त सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘सकाळ’ला दिली. ‘मतदार स्लीप वाटपाची ‘बीएलओं’ची यंत्रणा सुस्तच’ या आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने १ मेस प्रसिद्ध केले होते. (Collector Prasad statement Complete voter slip distribution by May 7)

त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले. संबंधित बीएलओंना मतदार स्लीपवाटपाची जबाबदारी दिली आहे. त्याबाबत प्रशिक्षणही दिले आहे. त्यांना प्रत्येक घरापर्यंत पोचण्यास उशीर लागत आहे. यामुळे ७ मेपर्यंत सर्व मतदार स्लीप पोचल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

मतदानाची दरवेळी घटत जाणारी टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी प्रशासकीय पातळीवर ‘बीएलओं’च्या यंत्रणेतून मतदारांच्या स्लीप वितरणाची प्रक्रिया अद्याप थंड बस्त्यात आहे.

विशेष म्हणजे, अन्य सर्व कामकाजाचा आढावा घेतला जात असताना, या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष होतेय. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्लीप मतदारांपर्यंत पोचविणारी ‘बीएलओं’ची यंत्रणा सक्रिय करावी, अशी अपेक्षा ‘सकाळ’ने १ मेच्या वृत्तपत्रात व्यक्त केली होती. (latest marathi news)

Collector Ayush Prasad
Jalgaon Lok Sabha Election : ‘होम वोटिंग’द्वारे पहिल्या दिवशी 52 जणांचे मतदान; 2 दिवस चालणार प्रक्रिया

प्रत्येक निवडणुकीसाठी सरकारचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यातही लोकसभेची दर पाच वर्षांनी होणारी सार्वत्रिक निवडणूक असली, की त्यावरील खर्चाला मर्यादाच राहत नाहीत. मतदारांना मतदान करण्याच्या सहभागासाठीही या खर्चातून मोठी तरतूद केली जाते. तरीही गेल्या काही वर्षांत सातत्याने मतदानाची टक्केवारी कमी होत असून, मतदारांमध्ये उदासीनता वाढतच आहे.

बीएलओच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधी प्रत्येक वस्ती, गल्ली, घरापर्यंत मतदारांच्या स्लीप पोचविण्याचे काम होत असते. मात्र, गेल्या काही निवडणुकांचा अनुभव पाहता मतदारांपर्यंत स्लीप पोहोचतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. स्लीप पोहोचली नाही, म्हणूनही अनेक जण मतदान करीत नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ‘सकाळ’ने आणून दिले.

Collector Ayush Prasad
Jalgaon Lok Sabha Election : झटपट ‘ब्रेन वॉशिंग’चे पवारांकडे कोणते मशिन? : प्रकाश आंबेडकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com