esakal | Jalgaon : डीडीआर बिडवई असतील निवडणूक निर्णय अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon : डीडीआर बिडवई असतील निवडणूक निर्णय अधिकारी

Jalgaon : डीडीआर बिडवई असतील निवडणूक निर्णय अधिकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता लवकरच जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरवात होणार आहे.

कोरोनामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तब्बल दीड वर्षापासून लांबली होती. सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने सहकार क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम पार पडला असून आता प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा होणार आहे.

या निवडणुकीसाठी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top