Ice Cream Pot: रेडिमेडच्या जमान्यात ‘आईस्क्रीम पॉट’ची क्रेझ कायम! भुसावळमध्ये आजही आईस्क्रीम पार्टीसाठी होतो वापर

Jalgaon News : फारच हौशी लोक असतील तेच सध्या आईस्क्रीम पॉट भाड्याने घेत आहेत, असे व्यावसायिक प्रदीप पाटील यांनी सांगितले
Ice Cream Pot & Pot made ice cream
Ice Cream Pot & Pot made ice creamesakal

भुसावळ : एकेकाळी उन्हाळा म्हटला की, आईस्क्रीमपॉट घरी आणून आईस्क्रीम पार्टी होत असे. यातून कौटुंबिक संवाद व एकत्रित काम करण्याचे संस्कार होतं, पण आता रेडिमेडच्या जमान्यात या पार्ट्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फारच हौशी लोक असतील तेच सध्या आईस्क्रीम पॉट भाड्याने घेत आहेत, असे व्यावसायिक प्रदीप पाटील यांनी सांगितले. (jalgaon craze of Ice Cream Pot continues news)

सध्या ऊन चांगलेच तापत आहे. त्यामुळे शीतपेयांबरोबरच आईस्क्रीमला मागणी वाढत आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक प्रकारचे आईस्क्रीम फ्लेवर्स बाजारात मिळत आहे. सायंकाळी सहकुटुंब आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन किंवा फॅमिली पॅक घरी आणून आईस्क्रीम खाल्ले जाते.

शहरात आईस्क्रीम पॉट भाड्याने देण्याची पाच, सहा दुकाने होती. दोन ते आठ लिटरपर्यंत एकूण चार प्रकारच्या पॉटला मागणी असे. बर्फ, मीठ, दूध आदी साहित्य आणून आईस्क्रीम करण्याची प्रक्रिया पार पाडली जात असे. बर्फ फोडणे, हॅण्डल फिरवणे आदी कामे घरातील सर्व लोक आनंदाने करीत.

यातून एकत्रित काम करण्याचे संस्कार होत व कौटुंबिक संवाद वाढत असे. चुका झाल्या तरी त्यातून शिकायला मिळत असे. पण कोण एवढा कुटाणा करीत बसेल? असे म्हणण्याची प्रवृत्ती वाढली आहे. असा अनुभव जुने विक्रेते दिलीप ओक यांनी सांगितले. १९७१ पासून ते आईस्क्रीम पॉट भाड्याने देत होते.

मागणी घटल्याने यंदापासून त्यांनी दुकानात पॉट ठेवणे बंद केले आहे. ते म्हणतात सुरवातीला मी पंजाबमधील जंडियाला गुरू येथून पॉट मागवत होतो. नंतर जळगावला देखील मिळत होते. आमचे किराणा दुकान असल्याने आईस्क्रीमला लागणारी पावडर, साखर, जाड मीठ, काजू, किसमिस, चेरी, रंग आदी वस्तूंची विक्री होत असे. (latest marathi news)

Ice Cream Pot & Pot made ice cream
Ice- Cream Cone Recipe: हायजीनची चिंता वाटते? घरीच बनवू शकता कुरकुरीत आईस्क्रीम कोन; मुलं होतील खुश

'आईस्क्रीम बनविण्याची कृती' अशी पत्रक आम्ही छापली होती पॉट बरोबर ते पत्रक लोक आवर्जून मागून घ्यायचे. अशी आठवण दिलीप ओक यांनी सांगितली. तर प्रदीप बुक डेपोचे प्रदीप पाटील म्हणाले, मी गेल्या सात वर्षांपासून आईस्क्रीम पॉट भाड्याने देत आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथून पॉट आणतो.

काही लोक बाहेर पाणी येत नाही म्हणून छिद्र मोठ करतात. परिणामी पॉट खराब होतो. मधला पंखा देखील तोडून आणतात. अर्थात आम्ही नुकसान भरपाई घेतो, असे असले तरी घरी आईस्क्रीम बनविणारे हौशी अजूनही आहेत. मात्र त्यांची संख्या कमी झाली आहे, असे पाटील म्हणाले.

घरीच आईस्क्रीम बनवितो : फालक

आईस्क्रीम घरी बनविण्याची हौस किती असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भुसावळमधील पांडुरंग टॉकीजचे मालक विलास फालक हे आहेत. त्यांनी चक्क आईस्क्रीम पॉट विकतच घेतला आहे. उन्हाळ्यात दहा, पंधरा दिवसातून एकदा घरीच आईस्क्रीम बनवितात. विशेषतः पाहुणे आले की पार्टी चांगली रंगते. आम्ही सर्वजण मनसोक्त घरचे आईस्क्रीम खातो, असे विलास फालक यांनी सांगितले.

Ice Cream Pot & Pot made ice cream
Ice Cream in Diet : डायटवर असलेल्यांनाही उन्हाळ्यात आईस्क्रिमची मजा घेता येईल? दीपिका पादुकोनच्या Fitness Trainer ने दिलीय रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com