.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पारोळा : तरवाडे (ता. पारोळा) येथील रहिवासी व सध्या सातपूर (नाशिक) येथे वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय संशयिताकडून येथील पोलिसांनी १९ दुचाकी जप्त केल्या. येथील पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, किशोर संजय चौधरी (वय ३०, रा. तरवाडे ता. पारोळा, हल्ली मुक्काम सातपूर कॉलनी, नाशिक) हा नाशिक शहरातून व परिसरातून दुचाकी चोरून पारोळा पोलिस ठाणाच्या हद्दीतील आडगाव, तरवाडे, शिवरे व परिसरात कमी किमतीत विकत होता. (19 bike seized by Parola police )