Jalgaon Crime News : तब्बल 20 दिवस उलटूनही मुख्य मारेकरी सापडेनात; खुनाचा तपास थंड बस्त्यात

Jalgaon Crime : शहरातील कालिंकामाता मंदिराजवळील हॉटेल भानूमध्ये तरुण किशोर अशोक सोनवणे याची हत्या करण्यात आली होती.
Kishore Sonavane
Kishore Sonavaneesakal

Jalgaon Crime News : शहरातील कालिंकामाता मंदिराजवळील हॉटेल भानूमध्ये तरुण किशोर अशोक सोनवणे याची हत्या करण्यात आली होती. शनिपेठ पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद ११ मारेकऱ्यांपैकी पोलिसांना सातच संशयित सापडले असून, खुनातील प्रमुख मारेकरी अद्याप मोकाट आहेत. राजकीय वरदहस्त प्राप्त मारेकऱ्यांना वाचविण्याचा पोलिस दलातर्फे प्रयत्न होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. (crime 20 days main killer is not found )

संशयितांना न्यायालयाने वाढीव कोठडीत रवाना केले आहे, तर गुन्ह्यातील प्रमुख संशयित नीलेश सपकाळे, आकाश सपकाळे या दोघांसह इतर तीन संशयितांचा शोध सुरू आहे. असोदा रोडवरील तरुण किशोर अशोक सोनवणे मित्रांसोबत कालिंकामाता मंदिर परिसरातील हॉटेल भानूमध्ये २२ मेस रात्री जेवणासाठी गेला होता. जेवत असताना, १०-१२ सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवून त्याची निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्यात हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांची ओळख पटविण्यात आली आहे.

असे आहेत संशयित

पोलिसांनी रुपेश सुभाष काकडे, रुपेश मनोहर सेानार, प्रशांत ऊर्फ आकाश युवराज सपकाळे, ईश्वर ऊर्फ दुर्लभ नथ्थू सपकाळे, मयूर विनोद कोळी, प्रशांत सुभाष काकडे, ईश्वर सुभाष काकडे यांना अटक केली आहे. संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपून ते कारागृहात न्यायालयीन कोठडीत आराम करीत आहेत, तर पोलिसी तपासही आता थंडबस्त्यात गुंढाळल्यात जमा आहे.

Kishore Sonavane
Jalgaon Crime News : दाणा बाजारातील ड्रायफ्रूटचे दुकान फोडले; साडेचार लाखांची रोकड लंपास

प्रमुख मारेकरी सापडेना...

मृत किशोरचे वडील अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात रूपेश सोनार, नीलेश ऊर्फ लोमेश युवराज सपकाळे, आकाश युवराज सपकाळे, मयूर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रूपेश सुभाष काकडे (सर्व रा. मोहन टॉकीज परिसर, असोदा रोड, जळगाव), दुर्लभ कोळी (सुनसगाव, ता. जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (श्रीराम कॉलनी, जळगाव) यांच्यासह अनोळखी तीन तरुण, अशा ११ संशयितांचा समावेश आहे. पोलिसांनी आजअखेर सातच मारेकऱ्यांना अटक केली असून, प्रमुख संशयित नीलेश ऊर्फ लोमेश युवराज सपकाळे, अमोल छगन सोनवणे यांच्यासह इतर दोन, अशा चार मारेकऱ्यांचा शेाध अद्याप लागलेला नाही.

स्वतः हजरच्या प्रतिक्षेत

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या मारेकऱ्यांपैकी प्रमुख मारेकरी, तसेच गुन्ह्याचा मास्टर माईंड नीलेश ऊर्फ लोमेश सपकाळे आणि त्याचे उर्वरित साथीदार स्वतःहून हजर होण्याची पोलिस वाट पाहत आहेत. ९० दिवसांनी गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर झाल्यानंतर मुख्य संशयित स्वतःहून पोलिसांत हजर होतील. जेणेकरुन पोलिस कोठडीची कटकट टाळता येऊन जामिनही लवकर मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

Kishore Sonavane
Jalgaon Crime News : सराफी दुकान फोडीतील साडे सहा किलो चांदी जप्त; दुकानाच्या पिशवीवरून लागला क्लू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com