Jalgaon Crime News : अपघातग्रस्त वाहनात आढळले 6 गोवंश! कोळन्हावी फाट्याजवळ प्रकाराबाबत यावल पोलिसात गुन्हा

Crime News : याप्रकरणी संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गोवंश मनवेल येथील गोशाळेत पाठवण्यात आले.
Cattles File Photo
Cattles File Photoesakal

यावल : यावल - चोपडा रस्त्यावर धानोरा गावाजवळील कोळन्हावी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी एका वाहनाचा अपघात झाला होता. या अपघात ग्रस्त वाहनात गोवंश असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व तेथून सहा गोवंश हस्तगत केले. याप्रकरणी संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गोवंश मनवेल येथील गोशाळेत पाठवण्यात आले. (Jalgaon Crime 6 cows found in accident vehicle yaval news)

यावल -चोपडा रस्त्यावरील तालुक्यातील कोळन्हावी फाट्यावर बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक एम. एच.०५ वाय. ए. ३०९२ या वाहनाचा मंगळवारी दुपारी अपघात झाला होता व त्यामध्ये गोवंश होते. तेव्हा सुज्ञ नागरीकांनी याची माहिती यावल पोलिसांना दिली असता यावल पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व तेथून त्यांनी सहा गोवंश ताब्यात घेतले.

व या प्रकरणी महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन (एम. एच.०५ वाय. ए. ३०९२) वरील अज्ञात चालकाविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात हवालदार भरत कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे. (Latest marathi news)

Cattles File Photo
Mumbai Crime: बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवुन उकळले 4 कोटी

गोवंश मनवेल गोशाळेत रवाना

सदर वाहनातून मिळालेले ६ गोवंश हस्तगत करण्यात आले. व हे सर्व गोवंश पालन पोषण च्या दृष्टिकोनातून मनवेल येथील श्री देवानंदजी गोशाळा मध्ये पाठवण्यात आले आहे. गोशाळेचे अध्यक्ष गोकुळ संतोष कोळी यांनी वाहन आणून गोशाळेत हे सर्व गोवंश नेले. त्यांचे ते पालन पोषण ते करणार आहे.

Cattles File Photo
Pune Crime News : कोरेगाव पार्कच्या महिलेला दोन कोटी रुपयांना गंडा ; कुरिअरमध्ये अमली पदार्थ असल्याची बतावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com