Jalgaon Crime : 20 दिवसानंतरही दरोडेखोर सापडेना; दरोड्यातील 1 कोटी 12 लाखांच्या वसुलीविषयी प्रश्नचिन्ह

Jalgaon Crime : राष्ट्रीय महामार्गावर मुसळी फाट्यावर शनिवार (ता.१७) १ कोटी ६० लाखांची रोकड लुटली गेली.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime : राष्ट्रीय महामार्गावर मुसळी फाट्यावर शनिवार (ता.१७) १ कोटी ६० लाखांची रोकड लुटली गेली. या घटनेला २० दिवस उलटले असून गुन्हे शाखेला अटक केलेल्या दोघा संशयितांकडून जेमतेम ४८ लाखांची वसुली करता आली. अजूनही उर्वरित १ कोटी १२ लाखांची रक्कम दरोडेखोरांच्या दुसऱ्या टोळीच्या ताब्यात असल्याने वसुलीविषयी प्रश्नचिन्ह आहे. (Jalgaon Crime after 20 days robber was not found Question mark on recovery of 1 crore 12 lakh)

मुसळी फाट्या जवळील उड्डाणपुलाखाली लाल स्कॉर्पिओतून आलेल्या दरोडेखोरांनी क्रेटा कारला धडक देत, तिघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिघांपैकी एकाच्या मांडीत शस्त्र खुपसून १ कोटी ६० लाखांची रोकड लुटली होती.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून अनिल भानुदास कोळी ऊर्फ बंडा (वय ३२) आणि दर्शन भगवान सोनवणे (वय २९) दोन्ही (विदगाव ता.जळगाव) या संशयितांनी डांभुर्णी येथे एका गोठ्यात पोत्यांत दडवून ठेवलेले ४८ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली.

तपास संथ

दोनच दिवसात गुन्ह्यातील सुत्रधारांच्या मुसक्या आवळून ४८ लाखांची वसुली करण्यात पोलिसांना यश आले असले तरी, गुन्ह्यात सहभागी उल्हासनगर (ठाणे) येथील सिक्कलगर टोळीतील चौघे सराईत आणि त्यांच्या ताब्यातील १ कोटी १२ लाखांची रोकड सापडलेली नाही. २० दिवसापासून संशयितांचा शोध सुरु असलेल्या या गुन्ह्यात फरार संशयितांच्या अटकेचे चिन्ह दिसत नाही.

Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime : घराचे कुलुप तोडुन धाडसी चोरी; पारुंडी येथील घटना, एक लाखाचा ऐवज लंपास

दरम्यान या प्रकरणात लूट झालेल्या पिंप्री (ता.धरणगाव) येथील दुर्गेश इंप्रेस जिनींगतर्फे आठवड्याला दोन तीन वेळेस अशा मोठ्या रकमेची वाटप करण्यात येते. त्यामुळे कुठल्या अप्रिय घटना घडू नये म्हणून कंपनीतर्फे रोकड आणि रोकड आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विमा काढलेला असल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरात राज्यात वाँटेड टोळी

या गुन्ह्यात हवी असलेली उल्हासनगरातील सिक्कलगर टोळी गुजरात राज्यातील बडोदा, सुरत, महाराष्ट्रात ठाणे, उल्हासनगर, पुणे, नाशिक आणि जळगाव अशा विवीध जिल्ह्यात मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात वाँटेड आहे.

Crime
Mumbai Crime: फसवणुकीच्या १० वर्षे जुन्या प्रकरणातील आरोपी अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com