Jalgaon Crime News : एका कॉलवरून अमळनेर पोलिसांनी लावला संशयितांचा छडा

Jalgaon Crime : अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातील ३० लाखांच्या ट्रकसह चोरांना पकडून मध्य प्रदेशातील पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : फक्त एका फोन कॉलवरून तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातील ३० लाखांच्या ट्रकसह चोरांना पकडून मध्य प्रदेशातील पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. २४ एप्रिलला मांडळ येथील एसएसटी पथकाला लोखंडी सळ्या भरलेला ट्रक संशयास्पदरित्या आढळून आला होता. पोलिसांनी अडवताच चालक फरारी झाला होता. इंदोर आणि धार जिल्ह्यादरम्यान बेटमा येथून इम्रान मोहंमद शेर मोहंमद यांच्या घरासमोरून १२ टन लोखंडाने भरलेला ट्रक (एमपी ४०, जीए ७७८) चोरीस गेला होता. (Crime Amalner police nabbed suspects from call )

एसएसटी पथकाने ट्रकसह ३० लाखांचा माल जप्त करून मारवड पोलिस ठाण्यात जमा केला होता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर व सहाय्यक निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी तपासाधिकारी हवालदार भरत ईशी, उज्वल पाटील, कैलास साळुंखे, हितेश बेहरे यांच्यावर संशयित शोधण्याची जबाबदारी सोपवली होती. ट्रक चोरणारे दोघे होते. त्या कालावधीत सुमारे ३० हजार कॉल झाले होते.

Crime
Jalgaon Crime News : रामदेववाडी ‘हीट ॲण्ड रन’ प्रकरण; मित्रांसह कार सोडून पळून गेलेल्या तिसऱ्याला अटक

पोलिसांना नेमके संशयित कोण, हे समजत नव्हते. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दोघांमधील एक कॉल तांत्रिकदृष्ट्या आढळून आला आणि हे दोघे जण मध्य प्रदेशातील असल्याचे निदर्शनास आले. हुसेन शौकत पठाण (वय २३), रमेश लक्ष्मण भिलाला (वय २०) या दोघांनी ट्रक चोरल्यापासून १०० किलोमीटरपर्यंत एकमेकांशी संपर्क केला नव्हता.

त्यामुळे मध्य प्रदेशातील पोलिसांना सुगावा लागला नव्हता. मात्र, अमळनेर परिसरात त्यांनी एकमेकांशी संवाद साधून वेगवेगळ्या दिशेने निघाले होते. तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने दोघी संशयितांना अटक करून अमळनेरला आणले होते. त्यांनतर माध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Crime
Jalgaon Crime News : बनावट दस्तावेज प्रकरणी टपाल कर्मचाऱ्यावर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com