Jalgaon Crime News : ग्रामस्थांनी अडविलेले अवैध गोवंश वाहतुकीचे वाहन घेउन चालक फरार

Crime News : ग्रामस्थांनी वरणगाव पोलिसांत निवेदन देऊन वाहनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली
Illegal cattle transport vehicle blocked by villagers
Illegal cattle transport vehicle blocked by villagersesakal

वरणगांव : भुसावळ तालुक्यातील सावतर निंभोरा येथे ग्रामस्थांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. ग्रामस्थ अवैध गोवंश वाहतुकीची पोलिसांच्या ११२ क्रमांकावर माहिती देत असताना चालक (एमएच १९.सी यु.००९६ ) वाहन घेउन फरार झाला. ग्रामस्थांनी वरणगाव पोलिसांत निवेदन देऊन वाहनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. (Jalgaon Crime driver absconded with vehicle of illegal cattle)

येथून जवळच असलेल्या सावतर निंभोरा गावाच्या मुख्य रस्त्याने अवैध गोवंश कोंबून भरलेले वाहन पोलिस पाटील व ग्रामस्थांच्या नजरेस पडले असता त्यांनी वाहनाला थांबवून चौकशी केली असता चालकाने उडवाउडवी उत्तर दिले. तर वाहनांत काही गोवंशांतील जनावरे जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदत क्रमांक ११२ वर संपर्क करून माहिती दिली.

त्याअनुषंगाने वरणगाव पोलिस स्टेशनच्या अधिकारी गणेश देशमुख यांनी वाहन पोलिस स्टेशनला आणावे अशी सूचना केली. ग्रामस्थ चालकाला वाहन पोलिस ठाण्यात घ्यावे असे सांगत असतानाच चालकाने चलाखी करत‌ वाहन पोलिस ठाण्यात न नेता तेथून वाहनासह पळून गेला. (latest marathi news)

Illegal cattle transport vehicle blocked by villagers
Nagpur Crime News : भूखंडावर कब्जा करण्याच्या वादात युवकावर हल्ला

याप्रकरणी सावतर निंभोरा येथील पोलिस पाटील अरुण कोळी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस अधिकारी गणेश देशमुख यांना सविस्तर प्रकाराची माहिती देत रोज गावाच्या मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात गोवंशाची वाहनात कोंबून वाहतूक होत असल्याची माहिती दिली.

तसेच अवैध गोवंश पळवून नेणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी सावतर निंभोरा येथील पोलिस पाटील अरुण कोळी,प्रदीप कोळी,रोशन कोळी , कुंदन कोळी,किरण कोळी,ज्ञानेश्वर कोळी, हिरामण कोळी यांनी केली आहे.

Illegal cattle transport vehicle blocked by villagers
Akola Crime : चौहट्टाचा गुटखा किंग गजाआड ; ७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त,दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com