Jalgaon Crime News : पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे जळगावात ड्रग्जचे रॅकेट‌

Jalgaon Crime : शहरातील शाहुनगर पडकी शाळेतून पोलिसांनी दहा लाखांचा एम.डी.ड्रग्सचा साठा जप्त केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबीच्या चर्चा ऐकायला मिळत आहे.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : शहरातील शाहुनगर पडकी शाळेतून पोलिसांनी दहा लाखांचा एम.डी.ड्रग्सचा साठा जप्त केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबीच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. गुटखा घेण्याची ऐपत नसलेल्यांनी लाखोंच्या उलाढालीचे ड्रग्सचे धंदे मांडले आहे. शहरात पान टपऱ्यावर ५० रुपयांत गांजाचे सिगारेट आणि गांजाविक्री होते. उघड्यावर अंडापाव गाड्यांवर मद्यपीच्या मैफली बसतात. (Jalgaon Crime Drug racket in Jalgaon due to negligence of police)

रात्री दहाला शहर बंद करणारे पोलिस नागरी वस्त्यांतील अवैध धंदे मात्र सर्रासपणे रात्रभर चालवू देतात. घराबाहेर दुकाने थाटून वाढत गेलेल्या अवैध धंद्याने काही दिवसांत बाळसे धरले. जिल्हा पेठ आणि शहर अशा दोन पोलिस ठाण्याच्या सामाईक हद्दीवर दोन्ही बाजूकडील चिरीमिरीखोर पोलिसांमुळे अवैध धंद्याला बरकत आहे.

काही पोलिस मित्रही धंद्यात...?

वाहनांच्या डिक्कीतून गांजाच्या पुड्या विकून पैसा मिळत असल्याने समाजकंटकांनी अनेक बेरोजगारांना गांजा विक्रीत सक्रिय केले आहे. पोलिस मित्र म्हणून पोलिसाच्या दुचाकीवर फिरणारे काही खबरे रात्री गुटखा-सिगारेट सोबत गांजा विकू लागले. गांजा विक्रेत्यांनी शहरा बाहेर गोदामात माल साठवला जातो. मात्र आता एमडी ड्रग्ज सुरु झाल्यापासून यातील उलाढाल वाढली आहे.

Crime
Pune Crime News : म्हाळुंगेतील एका तरुणाचे अपहरण

१ ग्रॅम एम.डी.ड्रग्सची पुडी ३ हजार रुपयात मिळते, १ ग्रॅम ड्रग्ज मध्ये ५ ते ७ वेळा नशा होते. दारुची नशा ४ तास, गांजा टिकतो १० तास तर एमडी ड्रग्ज थेट २४ तास नशेत ठेवणारी नशा असल्याने अल्पावधीतच एम.डी.पाऊचच्या अवैध मार्केटने अनेक बेरोजगारांना २० ते २५ हजारांच्या कमाईचा मार्ग खुला झाला आहे. आता यात पैसा इतका वाढला की, सूरत तर काही मुंबई सारख्या मोठ्या शहरातील अवैध धंद्याचे नेटवर्क जोडलेले असल्याची चर्चा आहे.

पोलिसांकडून प्रतिष्ठा..

पूर्वी पोलिस गाडी आली म्हणजे, गर्दी पांगायची आता मात्र शाहूनगर भागात 'पोलिस मित्र' इतके वाढले की, काठी दाखवणारे पोलिस आता हात दाखवून नमस्कार करुन निघून जातात. अवैध धंद्यावर कारवाया होत नाही. चुकून झाल्याच. तर दुसऱ्या दिवशी किती देऊन सुटला याचे भावही चर्चेच्या बाजारात ऐकायला मिळतात. पोलिसांकडूनच समाजकंटकांना प्रतिष्ठा मिळू लागल्याने अमली पदार्थाचा अंमल चांगलाच वाढला आहे.

Crime
Nashik Crime News: शहरातील बसस्थानकेच प्रवाशांसाठी असुरक्षित; सातत्याने होताहेत प्रवाशांच्या दागदागिन्यांची चोरी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com