Jalgaon Crime News : आयुर्वेदिक प्रॉडक्टसच्या नावाखाली बनावट दारू; 5 संशयितांना अटक

Jalgaon Crime : आयुर्वेदिक उत्पादन बनवण्याच्या या कारखान्यात रॉकेट या नावाने बनावट देशीदारुचा कारखाना चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Suspects arrested with fake liquor and team of State Excise Department
Suspects arrested with fake liquor and team of State Excise Departmentesakal

Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत परिसरातील के-१० सेक्टर येथील मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट या आयुर्वेदिक उत्पादन बनवण्याच्या या कारखान्यात रॉकेट या नावाने बनावट देशीदारुचा कारखाना चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज शनिवार (ता.४) पहाटे तीनच्या सुमारास केलेल्या कारवाईत ७५ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीची बनावट दारू व यंत्र सामग्री जप्त करण्यात आली. (Fake liquor in name of Ayurvedic products )

यात, ५ संशयीतांना अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात गस्त वाढवत नाकाबंदी चालविली आहे. जिल्‍ह्‍यातील अवैध धंद्यासह हातभट्ट्यावर कारवाया सुरु असतांना हा प्रकार उघडकीस आला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकाला बनावट दारूच्या कारखान्याची माहिती मिळाली.

त्यानुसार निर्जन ठिकाणी बंद पडलेल्या कंपनीत अवैधपणे धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे उघडकीस आले. जळगाव एमआयडीसीत कंपनीच्या बाहेर मंदार आयुर्वेदिकचा फलक असलेल्या कंपनीत थोडं दबकतच अधिकारी पहाटे अडीचला आत शिरले. आत आल्यावर पाहणी दरम्यान त्यांना एका ठिकाणी चक्क देशी दारुच्या बाटल्या पॅकिंग होताना आढळले.

पाउन कोटीचा मुद्देमाल

मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट नावाच्या कारखान्यात बनावट दारूचा कारखाना चालवला जात होता. रोज लाखोंचा माल पॅक करून त्याची सर्रास वाहतूक सुरु असताना एमआयडीसी पोलिसही या अवैध धंद्याबाबत अनभिज्ञच होते. असाच सिन्थेटीक्स ड्रग्ज केटामाईन निमीर्तीचा कारखाना अगदी पोलिस ठाण्याच्या मागच्या गल्लीत चालवला जात पाच आरोपींना अटक करण्यात आली.

Suspects arrested with fake liquor and team of State Excise Department
Jalgaon Fraud Crime : शेअर बाजारात गुंतवणूकच्या नावे 6 लाखांना गंडा!

असून त्याच्याकडून १५ लाख ७५ हजार किमतीच्या ४५ हजार सिलबंद रॉकेट संत्रा मद्याच्या बाटल्या, ३० लाख३० हजाराचे बनावट मद्याचे बॅरल, ३ लाखांच्या (१ लाख) रिकाम्या बाटल्या, ६ लाखांचे लेबल पट्टी मशिन, ६ लाखांचे बुच सिल बंद करण्याचे मशिन,५ लाखांचे वॉटर प्युरिफायर साडेचार लाखाचे वाहन यासह किरकोळ व इतर साहित्य असा एकूण ७५ लाख ६४हजार २०० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.

असे पथक झाले सहभागी...

आयुक्त विजय सुर्यंवशी, प्रसाद सुर्वे, उपआयुक्त उषा वर्मा, अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक डी. एम. चकोर, एस.बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक एस.बी.भगत, सी.आर.शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, गिरीष पाटील, सुरेश मोरे, पी.पी.तायडे, दिनेश पाटील, गोकुळ आहिरे, धनसिंग पावरा, एस.आर.माळी, विपुल राजपुत, आर.टी.सोनवणे, व्ही.डी.हटकर, एम.एम.मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांच्या पथकाने शनिवार(ता.४) रोजी पहाटे तीन वाजता छापा टाकला.

मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट नावाच्या या कंपनीत पथकाला रॉकेट व संत्रा या ब्रॅण्ड नावाची बनावट दारू तयार करुन त्याीच पॅकिंग व लेबलींग सुरु असल्याचे आढळले. येथे काम सुरू असताना व्हिडिओ शुटींगसह, काम थांबवून पंचनामा करत पथकाने कारवाई केली.घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कारखान्याला भेट देत माहिती जाणुन घेतली.

Suspects arrested with fake liquor and team of State Excise Department
Jalgaon Crime News : वढोदा येथे घरफोडी; दोघांना अडावद येथून अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com