Jalgaon Crime News : भुसावळ गोळीबार प्रकरणी चौथा संशयित ताब्यात; गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही केले जप्त

Jalgaon News : शहरातील सातारा भागातील मुख्य रस्त्यावर २९ मेस माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Crime
Crime esakal

भुसावळ : शहरातील सातारा भागातील मुख्य रस्त्यावर २९ मेस माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात येऊन त्यांना शुक्रवारी (ता. ३१) सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील चौथ्या संशयितास पोलिसांनी शनिवारी (ता. १) यावल तालुक्यातून अटक केली आहे. (Fourth suspect detained in Bhusawal firing case)

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तसेच भुसावळ उपविभागाचे तीन पथके असे एकूण चार पथकांची नेमणूक वरिष्ठांच्या आदेशावरून करण्यात आली आहे. सदरील पथक गुन्ह्यातील फरारी संशयितांचा शोध घेत.

असताना २९ मेस गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तूल यावल तालुक्यातील अकलूद गावामधील किरण कोळी या व्यक्तीकडे ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने मोर्चा त्या दिशेने वळवीत सापळा रचून शनिवारी (ता.१) अकलूद गावामधून संशयित किरण कोळी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तूल पथकाने ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे. (latest marathi news)

Crime
Nagpur Crime News : घरात आढळले बाप-लेकाचे मृतदेह

"शहरात गोळीबार प्रकरण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक व भुसावळ उपविभागात तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथके गुन्ह्यातील संशयितांचा कसून शोध घेत आहेत." - कृष्णांत पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी

Crime
Nashik Cyber Crime: स्टॉक IPO अन्‌ शेअरवर बोनसमधून चिक्कार नफा! डॉक्टरला घातला तब्बल दीड कोटींना गंडा; सायबर भामट्यांचा प्रताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com