
Jalgaon Crime News : शहरातून चोरीच्या दुचाकींचा शोध घेताना, आंतरराज्यीय टोळीचा छळा लावण्यात पोलिसांना यश आले. टोळीकडून १४ दुचाकींसह सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या. महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून वाहने चोरुन विक्री केल्याची कुबली संशयितांनी दिल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जळगाव शहर पोलिस ठाण्यातून चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध सुरू असताना, पोलिस कर्मचारी संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, सागर पाटील यांना पाळधी येथील एका चोरट्याची माहिती मिळाली होती. (Gang of vehicle thieves arrested by police in paldhi )