Jalgaon Crime News : कुटुंब महादेवाच्या दर्शनाला अन चोरट्यांचा बंद घरावर डल्ला

Crime News : सौभाग्य सेनापती २ जुलैला कुटुंबीयांसह उज्जैन आणि भोपाल येथे देवदर्शनासाठी गेले होते.
crime news
crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : उज्जैन येथे कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गेलेले छायाचित्रकार सौभाग्य चित्तरंजन सेनापती (वय २८, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. (Jalgaon Crime house raided by thieves)

सौभाग्य सेनापती २ जुलैला कुटुंबीयांसह उज्जैन आणि भोपाल येथे देवदर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे मंगळसूत्र, १२ ग्रॅमची सोन्याची चैन, १० ग्रॅमची चैन, १३ ग्रॅमचे टोंगल, सहा ग्रॅमचे कुंडले, एक ग्रॅमचे लॉकेट, दोन भार चांदीच्या पैंजण आणि १५ हजारांची रोकड रुपये असा एकूण दोन लाख ६८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. (latest marathi news)

crime news
Crime News : महिलांशी असभ्य वर्तणूकही भोवली! तळेगावचे मुख्याधिकारी पाटील निलंबित

शनिवारी (ता. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास सेनापती कुटुंब घरी परतले. त्यांना घराच्या दाराचे कुलूप तोडलेले व कडीकोयंडा लावलेला आढळून आला. घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि रोकड व सोने-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी सौभाग्य सेनापती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अविनाश बन्सीलाल पाटील (२६, रा. कुसुंबा) याला अटक केली असून, त्याने चोरी केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

crime news
Crime: बापपणाला कलंक ! वडिलांनीच केला पोटच्या पोरीवर अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.