Jalgaon Crime News : लाकडाची बेकायदा वाहतूक रोखली; ट्रॅक्टर ट्रालीसह लाकूड जप्त

Jalgaon Crime : बेकायदा वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन विभागाच्या पथकाने पकडले असून, सुमारे दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Tractors loaded with logs seized by forest department personnel.
Tractors loaded with logs seized by forest department personnel.esakal

रावेर : बेकायदा वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन विभागाच्या पथकाने पकडले असून, सुमारे दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वन विभागाचे पथक गस्त करीत असताना त्यांना विवरे ते वडगाव रस्त्याने विवरे गावाच्या बाहेर ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९, सी ८८८०) विना परवाना जळाऊ लाकडे वाहतूक करीत असताना आढळून आले.

यात ९ हजार १०० रुपये किमतीचे नीम झाडाचे जळाऊ व भोकर जळाऊ लाकूड, ट्रॅक्टर बाजारभाव अंदाजित रक्कम २ लाख ३० हजार रुपये असा एकूण रक्कम २ लाख ३९ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे. याबाबत संशयित शेख सलिम शेख युसूफ (रा. विवरा, ता. रावेर) याच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनरक्षक सुपडू सपकाळे, वाहनचालक विनोद पाटील यांनी केली.

Tractors loaded with logs seized by forest department personnel.
Beed Crime News: शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; 8 जणांनी गाडी अडवत केली लोखंडी रॉडने मारहाण

पाडळे येथे ९५ किलो डिंक जप्त

पाडळे (ता. रावेर) येथे सुमारे दहा हजार रुपये किमतीचा ९५ किलो सलई डिंक जप्त केला आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी (रावेर) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परिमंडळ अहिरवाडीमधील नियतक्षेत्र पाडळे येथील क्षेत्रात गस्त करीत असताना अवैध सलई डिंक वाहतूक करताना एक जण आढळून आला.

त्यात साधारण दहा हजार ४५० रुपये किमतीचा ९५ किलो सलई डिंक व ३६ हजार रुपये किमतीची मोटारसायकल वन विभागाने जप्त केली आहे. मोटारसायकलवरील व्यक्ती सलई डिंक फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या प्रकरणी वनरक्षक पडले खुर्द यांनी दाखल केला आहे.

सलई डिंक मिळून रक्कम ४६ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल वन कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार (अहिवाडी), वनरक्षक सुपडू सपकळे, वाहनचालक विनोद पाटील यांनी कारवाई केली.

Tractors loaded with logs seized by forest department personnel.
Crime News: १९९५ मध्ये हत्या, २९ वर्षांनी अटक पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com