Kishore Sonawane Murder Case : तत्कालीक वाद, पूर्ववैमानस्यातून तरुणाला संपवले; अकरापैकी 4 संशयित अटकेत

Jalgaon Crime News : इतरांचा शोध सुरू असून, जळगावात केव्हाही कुणाचीही हत्या होऊ शकते, असे भयावह वातावरण निर्माण झाले आहे. याला सर्वस्वी पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप मृत किशोर सोनवणे याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Relatives block the road outside District General Hospital
Relatives block the road outside District General Hospitalesakal
Updated on

जळगाव : शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील हॉटेल भानूमध्ये किशोर अशोक सोनवणे याचा निघृण खून करण्यात आला. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू असून, जळगावात केव्हाही कुणाचीही हत्या होऊ शकते, असे भयावह वातावरण निर्माण झाले आहे. याला सर्वस्वी पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप मृत किशोर सोनवणे याच्या कुटुंबीयांनी केला आहे. (jalgaon crime Kishore Sonawane Murder case)

मृत किशोर सोनवणे याचे वडील अशो सोनवणे (वय ६०, रा. प्रबोधननगर, हॉटेल साई पॅलेसच्या मागे,जळगाव) यांनी शनिपेठ पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा किशोर, पत्नी लताबाई, सून काजल आणि नात दिव्यांशी यांच्यासोबत ते वास्तव्यास आहेत. बुधवारी (ता. २२) रात्री दहानंतर मुलगा किशोर याचा मित्र अमोल सोनार ऊर्फ गप्या याचा फोन आला.

हॉटेल भानूमध्ये कालिंकामाता मंदिराजवळ किशोरला काही जणांनी मारहाण केली व त्यात तो बेशुद्ध झाला आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे अमोलने त्याच्या पालकांना सांगितले. त्यानंतर आम्ही परिवारासह जिल्‍हा रुग्णालय गाठले. तेथे त्यांना किशोरच्या मित्रांनी हकीगत सांगितली.

मित्रांच्या पार्टीचा बेत

रात्री आठला अमोल सोनार यांच्या घराजवळ किशोर सोनवणे आणि त्याचे मित्र गणेश घ्यार, अमोल कोल्हे, सुनील नावांदेकर, राजू कुशवाह, जयसिंग राजपूत, प्रशांत वाणी गप्पा मारत उभे होते. त्यावेळेला त्यांनी हॉटेल भानूमध्ये जेवणाला जाण्याचा बेत आखला. जेवणाला बसताना रात्री नऊला किशोरला फोन आल्याने तो बोलतानाचा बाहेर गेला. बाहेर एका चायनीज गाडीवरील रुपेश काकडे याच्याशी त्याचा वाद झाला. अमोल सोनार आणि त्याच्या मित्रांनी तो वाद सोडवून त्याला पुन्हा हॉटेल भानूमध्ये आणले. (latest marathi news)

Relatives block the road outside District General Hospital
Pune Crime : पुण्यात ३२ हॉटेलना अखेर टाळे;उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसांत कारवाया

काही क्षणातच शस्त्रांनी हल्ला

जेवणाच्या टेबलवर बसले असताना, अचानक हल्ला होऊन किशोर सोनवणे याला धरून धारदार शस्त्राने आणि लोखंडी दांड्याने मारहाण करण्यात आली. त्याला ओढत हॉटेलच्या दरवाजापर्यंत आणले आणि तिथून संशयित पळून गेले. अमोल सोनार व त्याच्या मित्रांनी बेशुद्ध किशोर सोनवणे याला उचलून जिल्‍हा रुग्णालयात आणले.

तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. त्यानंतर किशोरचे वडील अशोक सोनवणे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून रुपेश मनोहर सोनार, नीलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे, आकाश युवराज सपकाळे, मयूर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे (सर्व रा. मोहन टॉकीज परिसर, असोदा रोड, जळगाव), दुर्लभ कोळी (सुनसगाव, ता. जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (श्रीराम कॉलनी, जळगाव) यांच्यासह अनोळखी तीन तरुण, अशा अकरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चार मारेकरी अटकेत

शनिपेठ आणि एलसीबी पोलिसांनी प्रशांत सुभाष काकडे (वय ३०), रुपेश काकडे (वय २७), ईश्वर काकडे (वय २३), मयूर कोळी (वय २१) यांना अटक केली आहे. चौकशी सुरू असून इतरांच्या शोधार्थ पोलिस रवाना झाले आहेत.

Relatives block the road outside District General Hospital
Pune Crime : विमाननगरमधील दोन पब सील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com