Jalgaon Crime: रेल्वेमध्ये चोरी करणार संशयित गजाआड; भुसावळ लोहमार्ग पोलिसांची कारवाई; झडतीत आढळले पावणेदोन लाखांचे हँडसेट

Crime News : पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
Lohmarg police officers and personnel along with the arrested suspect.
Lohmarg police officers and personnel along with the arrested suspect.esakal

भुसावळ : रेल्वे सुरक्षा बलाचे जवान व लोहमार्ग पोलिसांनी एकाला संशयावरून ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल फोनसह एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. (Jalgaon Crime Suspected to steal in train arrested Bhusawal railway news)

याबाबत रेल्वे पोलिस ठाणे भुसावळ येथील दाखल गुन्ह्याच्या तपासात गोपनिय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिस कर्मचारी दिवानसिंग राजपूत, बाबू मिर्झा व रेल्वे सुरक्षा बलाचे सीपीडीएस नेमणुकीतील आरपीएफ आरक्षक महेंद्र कुशवाह व संदीप कुमार असे रेल्वेस्थानकाच्या जळगावकडील आऊटर परिसरात तपासकामी गेले असता त्या ठिकाणी एक जण संशयीतरित्या आढळून आला.

त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने नाव वीरेश साहेबराव हुसळे (रा. समता नगर, भुसावळ) असे सांगितले. चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्या अंगझडतीत व त्याच्या घराच्या झडतीमध्ये दाखल गुन्ह्यामधील चोरीस गेला एक लाख १८ हजारांचा अँपल कंपनीचा मोबाईल, दोन हजार रुपये किमतीचे हेडफोन, तीन हजारांचा चष्मा व इतर वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या ट्रेनमधून चोरलेले पाच मोबाईल असा एकूण १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Lohmarg police officers and personnel along with the arrested suspect.
Nashik Crime News : 2 वर्षांपासून फरार संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक; झटपट दुप्पट-तिप्पट रकमेचे आमिष

ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक स्वाती भोर (छत्रपती संभाजीनगर) व उप विभागीय पोलिस अधिकारी मारूती पंडित (लोहमार्ग मनमाड) यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिस ठाणे भुसावळचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब मगरे, पोलिस कर्मचारी दिवानसिंग राजपूत, बाबू मिर्झा, आरपीएफ, उप निरीक्षक के. आर. तर्ड, महेंद्र कुशवाह, संदिप कुमार यांनी केली आहे.

Lohmarg police officers and personnel along with the arrested suspect.
Pune Crime News : बालकाला पळवून तीन लाखांत विकलेल्या टोळीचा छडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com