Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : जळगावात वाळूमाफियांची दहशत सुरुच! मंडळ अधिकाऱ्याला धमकावून ट्रॅक्टर पळवले

Crime News : रामानंद घाटात मंडळ अधिकाऱ्यासह महसुल पथकाला धमकावून सुसाट ट्रॅक्टर पळवून नेल्याची उघडकीस आली आहे
Published on

जळगाव : बाभोंरी जवळ अवैध वाळू वाहतुकीमुळे तिघांचा जीव गेल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोवर रामानंद घाटात मंडळ अधिकाऱ्यासह महसुल पथकाला धमकावून सुसाट ट्रॅक्टर पळवून नेल्याची उघडकीस आली आहे. (Jalgaon Crime terror of sand mafia continues in Jalgaon marathi news)

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी पथक नेमून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवार (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास मंडळ अधिकारी रमेश वंजारी, तलाठी मनोहर बाविस्कर, ज्ञानेश्वर माळी, वीरेंद्र पालवे यांचे पथक गस्तीवर असताना रामानंदनगर घाटा जवळ वाघ नगर थांब्यावर त्यांना लाल रंगाचे विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळले.

ट्रॅक्टर चालक गजाराम बारेला (रा. हरिविठ्ठल नगर) याला वाळू वाहतूक परवान्यासंदर्भात विचारले असता त्याच्याकडे परवाना नसल्याने कारवाईसाठी ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेण्यासाठी मंडळ अधिकारी वंजारी ट्रॅक्टरवर बसले व इतर कर्मचारी दुचाकीवर जात असताना रामानंद नगर घाटाच्या पायथ्याशी ट्रॅक्टर मालक अमर सोनवणे व जितेंद्र सोनवणे (दोन्ही रा. समतानगर) आले व त्यांनी ट्रॅक्टर थांबवून महसूल पथकाशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा व दादागिरी करीत मंडळ अधिकाऱ्यांना ट्रॅक्टरवरून खाली ओढले आणि धमकी देवून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Crime News
Yavatmal Crime: नवीन कुलर न दाखविल्याने वृद्धाचा खून, दहीफळ येथील घटना; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दावा फोल

जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून अवैध वाहतूक बंद असल्याचा दावा केला जात असला तरी, बांभोरी जवळ सुसाट वाळू ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यूचा प्रकार चर्चेत असतानाच रामानंदनगर घाटात मंडळाधिकाऱ्यांना धमकावून ट्रॅक्टर पळवल्याचा प्रकारातून जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक आणि बेकायदेशीर गौण खनीज उत्खनन बंद करण्यात जिल्हा महसूल यंत्रणा अपयशीच असल्याचे पुढे येते आहे.

Crime News
Nagpur Crime: पैसे मागितल्यावर वारंवार करायचा टाळाटाळ, उधारीच्या वादातून बापलेकाचा शेजाऱ्यावर हल्ला; तिघे जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com