Jalgaon Crop Damage : कापणी केलेल्या मक्याला आग; 80 हजारांचे नुकसान

burned crop reference image
burned crop reference imageesakal
Updated on

जळगाव : आव्हाणे (ता. जळगाव) शिवारातील शेतात अचानक आग लागून कापणीनंतर शेतात साठवून ठेवलेला ८० हजारांचा मका जळून खाक झाला. तालुका पोलिसात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. (Jalgaon Crop Damage Fire to harvest maize crop 80 thousand loss jalgaon news)

burned crop reference image
Nashik : नाशिक-मुंबई महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत

ममुराबाद (ता. जळगाव) येथे चंद्रकांत निळकंठ पाटील (वय ३५) हे शेतकरी राहतात. ते गेल्या चार वर्षापासून आव्हाणे शिवारात चंद्रकांत राजाराम खडके यांची शेती नफ्याने करीत आहेत. यंदाच्या हंगामात त्यांनी शेतात मक्याचे पीक घेतले. कापणीनंतर मका शेतातच साठवून ठेवण्यात आला होता. शनिवार(ता.२९) रोजी शेतातील कामे आटोपून चंद्रकांत पाटील घरी परतले. सकाळी आल्यावर त्यांना शेतात साठवलेला मका जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

शेतात कुठलेही विद्युत वायरिंग गेल्या नसतांना आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. मात्र या अचानक लागलेल्या या आगीत चंद्रकांत पाटील यांचे ८० हजार रुपयांचे मक्याचे कणीस जळून नुकसान झाले. आगीबाबत चंद्रकांत पाटील यांनी रविवारी तालुका पोलिसात तक्रार दिली. पोलिस नाईक उमेश ठाकूर तपास करीत आहेत.

burned crop reference image
Achievement : दार्जिलिंगमधील खडतर गिर्यारोहण प्रशिक्षण आनंद बांगरने केले पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com