दिंडीवर दगडफेकीनंतर पाळधीत तीन दिवस संचारबंदी! : Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

Jalgaon News: दिंडीवर दगडफेकीनंतर पाळधीत तीन दिवस संचारबंदी!

जळगावमधील पळधी येथून नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या दिंडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळं दोन गट आपसात भिडले यामुळं पळधी इथं तणावाचं वातावरण होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Jalgaon curfew in Paldhi for three days after stone pelting on Dindi)

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, पाळधीत वातावरण शांत झालं असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या कलमांतर्गत २९ ते ३१ मार्च असे तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जर या संचारबंदीचं उल्लंघन झालं तर संबंधितांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

नक्की काय घडलं?

जळगाव येथून वणी गडावर दिंडी जात असताना पाळधी गावात दिंडी आली असता कुणीतरी दगड भिरकावल्याने दिंडीतील सदस्यांना लागला. त्यावरून दोन गटांत वाद निर्माण झाला, ही घटना २८ मार्च रोजी रात्री घडली. यातून पाळधी गावात रात्री दहाच्या सुमारास दोन्ही गटाकडून चारशे ते पाचशे लोकांचा जमाव एकमेकांसमोर आल्याने जोराद दगडफेक सुरू झाली. समाजकंटकांनी काही दुकानांची तोडफोड करून पोलिसांच्या गाड्यांवर तसेच रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

रात्री अकरा वाजता रस्त्यावर दगडांच्या खच दिसून आला, याबाबत जळगाव व धरणगावहून पोलिसांची कुमक मागविण्यात आली असून, गावातील रस्त्यावर पोलिसांचा पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही गटांमध्ये अचानक दंगल घडल्याने पाळधी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Maharashtra NewsJalgaon