Jalgaon Cyber Fraud : भुसावळमधील 3 भामटे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; डॉक्टर महिलेस 36 लाखांचा ऑनलाइन गंडा

Cyber Fraud : शहरातील तीन भामट्यांनी दिल्ली येथील डॉक्टर महिलेस ३६ लाखांचा ऑनलाइन गंडा घातला.
cyber fraud
cyber fraud esakal
Updated on

Jalgaon Cyber Fraud : शहरातील तीन भामट्यांनी दिल्ली येथील डॉक्टर महिलेस ३६ लाखांचा ऑनलाइन गंडा घातला. या प्रकरणी तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली येथील रहिवासी डॉ. निकिता आनंद महेंद्र प्रसाद यांना ऑनलाइन गुंतवणुकीच्या आधारे भुसावळच्या तीन भामट्यांनी प्रवृत्त केले व शेअर इंडिया नावाच्या कंपनीत व्यापाराचे एक गुलाबी चित्र दाखविले. (Cyber ​​Fraud 3 fraudsters in Bhusawal arrested by Delhi Police )

ज्यामुळे डॉ. प्रसाद यांनी ३६ लाख २७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या गुंतवणुकीचे मूल्य अंदाजे २.३६ कोटी दाखविण्यात आले. गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता या भामट्यांनी आपली फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे कथित घटनेला ही महिला बळी पडल्याने पीएस सायबर, दक्षिण पश्चिम, दिल्ली येथे २६ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

cyber fraud
Jalgaon Cyber Fraud : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून फसवणूक

या गुन्ह्यातील तीन संशयितांना दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (ता. २) भुसावळमधून ताब्यात घेऊन दिल्ली रवाना झाले. या प्रकरणी संशयित जयेश अनिल भोळे (वय २९, रा. दत्त नगर, वांजोळा रोड, भुसावळ), राकेश जाधव (वय २४, रा. पुष्पछाया अपार्टमेंट, सी-२६, रेल्वेस्थानक फिल्टर हाऊसजवळ, भुसावळ), हर्षवर्धन राजेश भोसले (वय ३३, रा. गौतम हाउसिंग सोसायटी, कंडारी, ता. भुसावळ) यांना दिल्ली पोलिसांनी भुसावळ शहरातून ताब्यात घेऊन पुढील तपासकामी दिल्ली रवाना झाले.

cyber fraud
Jalgaon Cyber Fraud : ईडीच्या नावे धमकावून 15 लाख लाटले; भुसावळच्या अभियंत्याला ऑनलाईन गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com