
अमळनेर : कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाई व कर्तव्यात कसुरीमुळे अमळनेर तालुक्यातील सुमारे १३५ शेतकरी एक कोटी ३५ लाख रुपयांच्या ठिबक अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दांगडो केला. शासनाकडून अमळनेर तालुक्यासाठी ४९४ शेतकऱ्यांसाठी चार कोटी ४६ हजार रुपये अनुदान मंजूर होते. मात्र, अमळनेर तालुक्यातील कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक गणेश पाटील आणि सागर चौधरी यांच्या आपसातील वादामुळे वरिष्ठ पातळीवर याद्याच गेल्या नसल्याने सुमारे १३५ शेतकरी वंचित राहिले. (Danga in Amalner Taluka Agriculture Office deprived of subsidy of farmers drip )