Jalgaon Devendra Fadanvis Daura : आम्हाला बिळातून काढण्याची भाषा करू नये : उपमुख्यमंत्री फडणवीस

Political News : जळगावी बुधवारी (ता. ८) दुपारी भडगाव रोड भागातील अटल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते
Devendra Fadanvis
Devendra Fadanvisesakal

पाचोरा : जे अडीच वर्षे बिळात बसून राज्यकारभार करीत होते, तेच आता आम्हाला बिळातून बाहेर काढण्याची भाषा करीत आहेत. आम्ही वाघ आहोत आम्हाला हात लावायची कोणाची हिंमत नाही. पण यांचे डोके फिरले आहे. ज्यांच्याजवळ नेता, नेतृत्व व नियत नाही अशांनी सत्तेवर येण्याची लालसा ठेवणे हास्यास्पद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Jalgaon Devendra Fadanvis Daura)

जळगावी बुधवारी (ता. ८) दुपारी भडगाव रोड भागातील अटल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. उन्नती पाटील या विद्यार्थिनीने देवेंद्र फडणवीस यांना स्केच छायाचित्र, अभिलाषा रोकडे यांनी शिवप्रतिमा तर कवाडे गटाचे राजू मोरे यांनी संविधानाची प्रत भेट दिली.

फडणवीस यांनी भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व जय श्रीरामांचा जयघोष करून भाषणाला सुरवात केली. ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

महायुतीवाल्यांना आम्हाला शिव्या देण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. निवडणुकीनंतर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे शरद पवार यांचे वक्तव्य चिंताजनक असल्याचे सांगून बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दिवशी काँग्रेसशी युती होईल, त्या दिवशी माझे दुकान बंद करेल असे म्हटले होते. (Latest Marathi News)

Devendra Fadanvis
Devendra Fadnavis : यंदा मतदान भाजपसाठी नव्हे; तर भारतासाठी करावे : देवेंद्र फडणवीस

त्यांचेच पुत्र काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत असल्याचे सांगून देशापुढे नरेंद्र मोदी व राहुल गांधी हे दोन पर्याय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या रेल्वेला अनेक डबे असून नरेंद्र मोदी त्याचे इंजिन आहे. परंतु आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे. इंजिनात सामान्यांना बसण्यासाठी जागा नसते.

गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी विकासाचा मोठा चमत्कार केला आहे. शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादकांसाठी चार हजार कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र, आचारसंहितेमुळे त्यांचे वाटप करता येत नाही. निवडणूक संपताच कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात हे पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadanvis
Devendra Fadnavis : व्यापाऱ्यांसह उद्योजकांनी बळ द्यावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जालन्यात आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com