Jalgaon News : तपासणी केलेल्या दागिन्यांचे वजन 21 किलो : संचालक सिद्धार्थ बाफना

Jalgaon News : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने २१ किलो सोन्यासह दागिन्यांची ऑर्डर दिली होती. त्यानुसार सिक्वेल लाजेस्टिकचे वाहन ते ऑर्डर घेऊन २० एप्रिलला आले.
Gold
Gold esakal

Jalgaon News : येथील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने २१ किलो सोन्यासह दागिन्यांची ऑर्डर दिली होती. त्यानुसार सिक्वेल लाजेस्टिकचे वाहन ते ऑर्डर घेऊन २० एप्रिलला आले. त्या वाहनाची सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्या वेळी २७ किलो वजनाचे दागिने होते, असा चुकीचा मेसेज प्रसार माध्यमातून प्रसारित झाला. (Bafna jewellers)

मात्र प्रत्यक्षात आमची ऑर्डर वीस किलोचीच होती. तेवढाच माल आला, अशी माहिती रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना, सिद्धार्थ बाफना यांनी शनिवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली. बाफना म्हणाले, की दरवेळी आम्ही मुंबईवरून दागिने मागवितो. आम्ही ऑर्डर दिलेल्या दागिन्यांची गाडी २० एप्रिलला जळगावला आली असता.

कुसुंबा नाका चेक पॉइंटवर सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सुधळकर व त्यांच्या पथकाने वाहनात काय आहे, याबाबत विचारणा केली. त्या वेळी गाडीसोबत असलेल्या व्यक्तीने गाडीत सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने असल्याचे सांगितले. मात्र पथकाने दागिन्यांच्या वाहनासोबत असलेली कोणतीही कागदपत्रे तपासले नाहीत.

वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा करून घेतले. याबाबत चौकशीसाठी जळगाव प्राप्तिकर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांचे पथक शोरूमवर आले. दुसऱ्या दिवशी नाशिक प्राप्तिकर विभागाचे पथकही आले. (Latest Marathi News)

Gold
Jalgaon News : भाजपला बड्या नेत्यांच्या सभांच हवे ‘कन्फर्मेशन’; मोदी, योगी, गडकरी, स्मृती इराणींच्या सभांचे नियोजन

त्यांनीही चौकशी केली. सर्व पथकांना आम्ही दिलेल्या दागिन्यांची ऑर्डर, पद्धत, दागिन्यांचे बिल कसे अदा केले, याची माहिती दिली. त्यांनी सर्व क्रास चेक केले. त्यांचे समाधान झाल्याने त्यांनी २६ एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आमच्या दागिन्याचे वाहन आमच्याकडे पोच केले.

वाहनाला पोलिस सुरक्षा

प्रत्यक्षात नऊ किलो ५२ ग्रॅम ९६० मिलिग्राम सोने, ११ किलो ८९१ ग्रॅम ६२० मिलिग्राम चांदी, एक किलो १० ग्रॅम ८७० डायमंड अलंकार असे एकूण २१ किलो ५५ ग्रॅम ४५० मिलिग्रॅम दागिने होते. मात्र २७ किलो सोने असल्याची चुकीची माहिती प्रसारित केली गेली. आम्ही ‘जहाँ विश्‍वास ही परंपर है’ या ब्रीदवाक्यावर व्यापार करतो, असेही बाफना यांनी सांगितले.

Gold
Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेष पाटील यांचे पक्षांतर विरोधकांना यश देणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com