Jalgaon District Cooperative Bank
Jalgaon District Cooperative Bankesakal

Jalgaon Crop Loan: खरीप पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवार! 965 कोटी रुपयांचे वाटप; राष्ट्रीयकृत बँकांचा आखडता हात

Jalgaon News : राष्ट्रीय बँकांनी आखडता हात घेत केवळ ३८ टक्केच कर्जवाटप केले आहे. खरीप कर्जवाटप करण्यात राष्ट्रीय बँका पुढे असायला पाहिजेत. मात्र, त्या मागे आहेत.

Jalgaon Crop Loan : जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी ९० टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, कर्ज घेण्यासाठी त्यांना मोठा आधार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच ठरली आहे. जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना ९६५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या उलट राष्ट्रीय बँकांनी आखडता हात घेत केवळ ३८ टक्केच कर्जवाटप केले आहे. खरीप कर्जवाटप करण्यात राष्ट्रीय बँका पुढे असायला पाहिजेत. मात्र, त्या मागे आहेत. (Jalgaon District Bank Leader in Kharif Crop Loan)

बँकेचे महाव्यवस्थापकांसह सर्वच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खरिपपात शंभर टक्के कर्जवाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवून केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. इतर शेतकऱ्यांना अजूनही राष्ट्रीयकृत बँकेत खरिप कर्जासाठी येरझाऱ्या घालाव्या लागत आहेत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने ९३१ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात बँकेने जास्तीचे कर्ज वाटप केले आहे. सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना एक हजार ५० कोटीपर्यंत कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे.

पहिल्या तीन महिन्यांतच बँकेने शासनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्हा बँकेने जिल्ह्यातील सर्व शाखांना पत्र पाठवून अल्प मुदत पीक कर्जावरील प्रत्येक शेतकरी सभासदांकडून दोनशे रुपये प्रोसेसिंग शुल्क व जीएसटीचे छत्तीस असे दोनशे छत्तीस रुपये आकारू नये, अशा सूचना गेल्या वर्षीच दिल्या होत्या. (latest marathi news)

Jalgaon District Cooperative Bank
Water Supply : कोल्हापूरला जमते, सांगलीला का नाही? काळम्मावाडीतून आणले पाणी

त्या यंदाही कायम ठेवल्या आहेत. अल्पमुदत शेती कर्जावर शून्य टक्के व्याजदराची सवलत यंदाही सुरूच ठेवली आहे. शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर तपासू नये, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सिबिल स्कोअर कमी किंवा शून्य असला, तरी जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देत आहे.

आकडे बोलतात...

जेडीसीसी बँकेतर्फे खरीप कर्जवाटप

*शेतकरी : १ लाख ६५ हजार

*कर्जवाटप : ९६५ कोटी

-----

राष्ट्रीयकृत बँक : ३८ टक्के

ग्रामीण बँक : ४० टक्के

"आतापर्यंत जिल्हा बँकेने १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना ९६५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. अजूनही कर्जवाटप सुरू आहे. सिबिल स्कोअर कमी किंवा शून्य असला, तरी शेतकऱ्यांना कर्ज दिले जात आहे."- जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जेडीसीसी

Jalgaon District Cooperative Bank
Jalgaon Police Transfer : पोलिसांचे बदली गॅझेट अंतिम टप्प्यात! एसपींनी घेतल्या ऑनलाईन मुलाखती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com