Jalgaon Lok Sabha Constituency : राजकारणात मैत्री जपत मित्राला केले आमदार, खासदार

Lok Sabha Constituency : राजकारणात जिवलग मित्राला आमदार करण्यापर्यंत मैत्री जोपासण्याची जळगाव जिल्ह्याची परंपरा आहे.
 Karan Pawar, Unmesh Patil
Karan Pawar, Unmesh Patilesakal

Jalgaon News : राजकारणात फार काळ कुणी कुणाचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा शत्रूही नसतो, असे म्हटले जाते. परंतु राजकारणात जिवलग मित्राला आमदार करण्यापर्यंत मैत्री जोपासण्याची जळगाव जिल्ह्याची परंपरा आहे. त्याच परंपरेत माजी खासदार उन्मेष पाटील आपल्या मित्राला खासदार करणार का, याकडेच आता जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या राजकारणात मैत्री जोपासण्याची परंपरा आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपले शाळेतील जिवलग मित्र कोल्हापूरचे श्रीनिवास पाटील यांना राज्याचे राज्यपाल तसेच खासदाराही केले. पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांनाही आमदार केले.

सुरेशदादा-शरद वाणी

आमदार सुरेश जैन यांनीही आपली मैत्री जपली आहे. आपले जिवलग साथीदार शरद वाणी यांना एकवेळा नव्हे; तर दोनवेळा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार केले. सुरेश जैन यांनी १९९२ मध्ये शरद वाणी यांना आमदार करताना थेट पक्षनेतृत्वाशी पंगा घेतला होता. पक्षनेतृत्वाने विधान परिषदेसाठी उमेदवार निश्‍चित केला होता. अर्ज भरण्यासाठी ते मुंबईहून हेलिकॅप्टरने जळगावला आले होते.

मात्र त्यांना अर्ज न भरताच परत जावे लागले. सुरेश जैन यांनी आपला नकार कायम ठेवला व आपले मित्र शरद वाणी यांचा अर्ज दाखल केला. एवढेच नव्हे; तर त्यांना आमदार म्हणून निवडूनही आणले. त्यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनाच उमेदवारी देऊन निवडून आणले. दिवंगत शरद वाणी यांनीही अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत मैत्री जपली, त्यांनी सुरेश जैन यांच्या जीवनावर पुस्तकही लिहिले. (latest marathi news)

 Karan Pawar, Unmesh Patil
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेचं मैदान अन्‌ राजकारणातील दिल, दोस्ती, दुनियादारी

एकनाथ खडसे-गुरुमुख जगवानी

राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये मोठा वकूब होता. खडसे ठरवतील तोच उमेदवार असे. त्याला पक्षाच्या नेतृत्वाकडूनही फारसा विरोध होत नव्हता. त्यांनी आपले मित्र गुरुमुख जगवानी यांना २००९ मध्ये स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी देऊन निवडूनही आणले.

जगवानी यांनीही खडसे यांच्याशी मैत्री कायम टिकवली. एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, त्या वेळी जगवानीही भाजप सोडून त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आजही त्यांची मैत्री कायम आहे.

गिरीश महाजन-चंदूलाल पटेल

राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन भाजपचे आज सरकारचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचा पक्षात मोठा दबदबा आहे. महाजन यांनीही आपल्या उद्योजक मित्राला २०१६ मध्ये विधान परिषदेवर निवडून आणून आमदार केले. चंदूभाई पटेल उद्योजक असल्याने त्यांचा राजकारणाशी फारसा काही संबंध नव्हता. मात्र ते गिरीश महाजन यांचे ते मित्र होते. त्यांनीही विधान परिषदेत भाजपतर्फे आपल्या मित्राला उमेदवारी देऊन आमदार म्हणून निवडून आणले.

 Karan Pawar, Unmesh Patil
Jalgaon Lok Sabha Constituency : सुरेश जैन, एकनाथ खडसे यांची राजकीय निवडणुकीच्या मैदानातून ‘एक्झिट’

उन्मेष पाटील-करण पवार?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगावच्या भाजपमध्ये जोरदार उलथापालथ झाली. उन्मेष पाटील हे पक्षाचे विद्यमान खासदार असतानाही त्यांना उमेदवारी देताना पक्षाने डावलले. त्यामुळे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. मैत्रीला जागून पारोळा येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही भाजपचा राजीनामा दिला.

त्यानंतर दोघांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्या वेळी उन्मेष पाटील उमेदवारी करतील, असे वाटले होते. परंतु आपल्या सोबत पक्ष सोडून आलेला मित्र करण पवार यांना उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळवून दिली.

एवढेच नव्हे; तर मित्राला खासदार करण्यासाठी त्यांनी प्रचारात जिवाची बाजी लावली. येत्या ४ जूनला निकालात जनतेचा कौल कळेलच, विजय झाल्यास मैत्रीखातर आपली उमेदवारी न करता मित्राला खासदार करणारा राजकीय मित्र म्हणून त्यांची ओळख राहील. राज्याच्या राजकीय मैत्रीच्या परंपरेत त्यांचेही नाव जोडले जाईल एवढे मात्र निश्‍चित.

 Karan Pawar, Unmesh Patil
Jalgaon Lok Sabha Constituency : आगामी राजकीय वाटचालीसाठी ‘है तय्यार हम..’दिग्गजांच्या वारसदारांचा लोकसभा निवडणुकीत प्रभावी सहभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com