District Milk Union : लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट

District Milk Union News
District Milk Union Newsesakal

जळगाव : कथित गैरव्यवहार, त्यावरून रंगलेल्या राजकीय लढाईमुळे चर्चेच्या व उत्सुकतेचा विषय ठरलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील लढतींचे चित्र सोमवारी (ता. २८) स्पष्ट होणार आहे. माघारीच्या आदल्या दिवसापर्यंतही सर्वपक्षीय पॅनल दृष्टिपथात न आल्याने निवडणूक अटळ असल्याचे मानले जात असून, सोमवारी माघारीच्या अंतिम दिवशी रिंगणातील दिग्गज काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक होत असून, या प्रक्रियेत सोमवार उमेदवारी माघारीचा अंतिम दिवस आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे व मंत्रिद्वयी गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांमध्ये निवडणुकीनिमित्त काही दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगलाय. त्यातच दूध संघातील लोणी व दूध पावडरच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्यावरून खडसे व महाजनांच्या गटात संघर्ष सुरू आहे. ( Jalgaon District Milk Union Election Result Final Design Announced in Monday Jalgaon News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

District Milk Union News
Jalgaon Crime News : कासोद्यात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अशा स्थितीत निवडणूक होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहकारातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा सर्वपक्षीय पॅनल असावे, यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खडसे-महाजन वाद विकोपाला गेल्यानंतर हे प्रयत्न आता अपयशी ठरताना दिसत आहेत. निवडणुकीसाठी मंत्री, आमदार, माजी आमदारांसह दिग्गजांनी अर्ज भरून ठेवले. दूध संघातही आमदार, खासदार संचालक होणार असल्याने त्यावर चांगलीच टीका होत असून, काही दिग्गज निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत आहेत.

ची भाजपला संधी

खडसेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व शिंदे-भाजपसमर्थक, अशा दोन गटांत निवडणुकीची शक्यता असून, त्यातून नेत्यांचे सहकारातील राजकीय वर्चस्व सिद्ध होणार आहे. त्यामुळे सर्वांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत ‘मविआ’ने निर्भेळ यश मिळवून भाजपला धोबीपछाड दिली होती. त्याचा उलटफेर करण्याची संधी भाजप-शिंदे गटाला दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे.

District Milk Union News
Jalgaon Money Fraud : चाळीसगावातील बँकेची 1 कोटी 30 लाखांत फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com