Jalgaon District Milk Union : 9 टन भुकटीसह 14 टन लोण्यावर बोक्यांचा डल्ला!

District Milk Union
District Milk Unionesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघात १४ टन लोण्यासह दूध भुकटीची बेकायदेशीररीत्या विल्हेवाट सव्वा कोटीची अफरातफर केल्याप्रकरणी कार्यकारी संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न झाल्याने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी गुरुवारी (ता.१३) शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. दुपारी ४ वाजेपासून पोलिस ठाण्यात दाखल खडसे रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते.

दरम्यान, याच प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळेही दाखल झाल्यामुळे पोलिस ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले.(Jalgaon District Milk Union News Illegal disposal of 9 tonnes of flour and 14 tonnes of butter Jalgaon Crime News)

District Milk Union
Jalgaon : पोलीस मिळेना, अतिक्रमण हटेना!

असा आहे प्रकार

जळगाव जिल्‍हा दूध उत्पादक संघात साधारण दीड महिन्यापूर्वी तूप विक्रीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी शैलेश सुरेश मोरखडे यांच्या तक्रारीवरून(गु.र.क्र.२७३/२०२२ कलम-४२०,४०६,३४ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नुकतेच दोन दिवस आधी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक व शहर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज सादर करून लोणी(बटर) यासह ८ ते ९ मेट्रिक टन दूध भुकटी परस्पर विक्री करून त्याचा गैरव्यवहार झाल्याचे या तक्रारीत नमूद केले होते. बुधवारी (ता.१२) दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता मागील क्षुल्लक गुन्ह्यात जबाब नोंदवून घेतला, तसेच त्या जबाबाची प्रत त्यांना सुपूर्द केली. त्यात नमूद केल्याप्रमाणे ८ ऑक्टोबरला त्यांनी दूध संघातील विक्री विभागात कार्यरत संदीप झाडे, स्वप्नील जाधव, रवी वानखेडे, नितीन पाटील, महेंद्र केदार यांना स्टॉक तपासणीच्या सूचना केल्या होत्या. त्यात असे निदर्शनास आले की, २ ऑक्टोबर २०२२ला १४ टन पांढरे लोणी (अंदाजित किंमत ७० ते ८० लाख) संघाच्या बाहेर वाई (जि.सातारा) येथे शीतगृहात पाठविल्याची नोंद रजिष्टरमध्ये घेण्यात आली. प्रत्यक्षात असा कुठलाही माल बाहेर गेला नाही. तर, घट लपविण्यासाठी हा उपद्‌व्याप असल्याचे आढळून आले आहे.

कोटीचा गैरव्यवहार

११ ऑक्टोबरला दूध संघाचे अधिकारी संदीप झाडे, स्वप्नील कार्ले, नितीन पाटील, एन.व्ही.पाटील, प्रशांत बावस्कर, अशांनी दूध भुकटी (पावडर)ची तपासणी केली असता ९ मेट्रीक टन मालाची तफावत आढळून आली. लोणी व भुकटी प्रकरणात तब्बल १ कोटी ते १ कोटी ३५ लाखांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याआधारे जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित यांच्या विक्री विभागातील अधिकारी अनंत अंबिकर, महेंद्र नारायण केदार, कामगार ठेका अंतर्गत सहाय्यक सुनील चव्हाण अशांनी संगनमत करून १४ टन बटर(लोणी)च्या खोट्या नोंदी घेतल्या तसेच ९ टन दूध पावडरची परस्पर विल्हेवाट लावून १ ते १ कोटी ३५ लाखांचा अपहार केल्याचा जबाब सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांनी घेतला आहे.

खडसेंचा ठाण्यात ठिय्या

दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक लिमये यांना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस दाद देत नाही म्हणून चेअरमन मंदाकिनी खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे ठिक चार वाजता शहर पोलिस ठाण्यात धडकले. निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी अशांनी या प्रकरणी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर एकनाथराव खडसे ठाम असल्याने रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठाण मांडले होते. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता आमदार खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर मंडप टाकून आपले आंदोलन सुरूच ठेवले.

संशयितांना पोलिसांनी पळवले

कार्यकारी संचालक तक्रार घेवुन आल्यावर कालच पोलिसांनी तक्रार दाखल केली असती तर, तिन्ही मुख्य संशयित हातोहात घरी सापडले असते. आता मात्र, त्यांनी पळ काढला असून पोलिसांच्याच चुकीमुळे ते पळून गेल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. याबाबत पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर- पाटील आणि पोलिस महासंचालकांशी बोलणे झाले असून वरिष्ठ स्तरावर चर्चा करून याप्रकरणी निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका खडसे यांनी घेतली. या ठिय्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन खडसेंसोबत पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली.

भोळेंचीही गुन्ह्याची मागणी

११ ऑक्टोबरलाच आमदार मंगेश चव्हाण यांनी तक्रार दिलेली असताना पेालिस दलाने अद्याप कारवाई केली नसल्याने स्थानिक आमदार राजूमामा भोळे आणि भाजप कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठत याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

District Milk Union
Jalgaon : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कुंटणखान्यावर धाड

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आर्थिक गुन्ह्यांमध्ये (ललिता कुमारी खटला) थेट गुन्हा दाखल करण्यापेक्षा तक्रारी अर्ज घेवून त्यावर सखोल चौकशीअंतीच गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाच्या सूचना आहेत. दूध संघाचे प्रकरण तत्काळ कारवाईसाठी बॉडी ऑफेन्स नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आलेल्या तक्रारींचे अवलोकन करून यावर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भात आमदार खडसेंना लेखी पत्र दिले जाणार आहे."

- डॉ. प्रवीण मुंढे ,पोलिस अधीक्षक, जळगाव

District Milk Union
Jalgaon : जिल्हा दूध संघात लोणी साठ्याचा सव्वा कोटीचा गैरव्यवहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com