
रावेर : कुणी शिक्षक देता का शिक्षक? अशा घोषणा तालुक्यातील थेरोळा येथील सरपंचांसह ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात दिल्या आणि या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच शाळेचा वर्ग भरविला. शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (call from villagers of Therola Fasting in Panchayat Samiti premises for teachers)