
पारोळा : ‘आमच्या पक्षात या म्हणून अनेकदा मंत्रीपदाची ऑफरही मिळाली. मात्र मी कधीही प्रलोभनाला बळी पडलो नाही. (कै.) आमदार भास्करराव पाटील यांची शिकवण असल्याने सुमारे ३५ वर्षांपासून समाजकारणातून राजकारण करीत आहे. आजही एकनिष्ठेने पक्षाचे काम करीत आहे. अनेकांनी स्वतःच्या लाभासाठी पक्ष बदलवले. मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहणार आहे. भाजपात जाणार नाही, पवार हेच माझ्या गळ्यातील ताईत आहेत’, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केले. (Dr Satish Patil statement of With Sharad Pawar till his last breath )