
जळगाव : गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस उरले असून, भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणेशभक्त सार्वजनिक मंडळाच्या गणपती मूर्तीचे दर्शन घेण्यासह देखावे पाहण्यासाठी अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या तुरळक सरी अंगावर झेलत गर्दी वाढू लागली आहे. शहरातील प्रमुख चौकांसह रस्ते शनिवारी गर्दीने फुलून गेले होते. पोलिस प्रशासनाकडून ठिकठिकाणी दक्षता पथके नियुक्त केली आहेत तर रविवारचा सुटीचा दिवस लक्षात घेता प्रशासनाने पार्किंगसह नियोजन केले आहे. (excitement of Ganeshotsav is at its peak with crowd to decoration spectacle)