
भुसावळ : सध्या गणेशोत्सव जल्लोषात सुरू आहे. या आनंदाच्या भरात लेझर किरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे नजरेस पडत आहे. मात्र त्याचा नेत्रपटलांवर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन मिरवणुकीत लेझरचा वापर करू नये, 'लेझर शो'च्या लाइटमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. त्यासोबत रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो व नजर कायमस्वरूपी कमी होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. (expert doctor advice to citizens Aware of laser light in ganpati procession )