Jalgaon News : जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; मृत भुसावळचा रहिवासी

Latest Jalgaon News : हर्शलने असे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Death News
Death Newsesakal
Updated on

Jalgaon News : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिक्षण घेणारा हर्शल सुधाकर सोनवणे (वय १७, रा. दादावाडी) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २१) घडली. मात्र, हर्शलने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (extreme step taken by engineering student)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com