Jalgaon News : पती-पत्नीची गळफास घेऊन उचलले टोकाचे पाऊल; रावेर, निंभोरा हद्दीतील घटना

Jalgaon : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पती व पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
Death
Deathesakal

Jalgaon News : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पती व पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत रावेर व निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पतीपत्नीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. खिरोदा येथे घटनास्थळी भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे यांनी भेट दिली. ( Extreme step taken by hanging husband and wife )

मध्य प्रदेशातील बेलखेडा (जि. खरगोन) येथील व हल्ली मुक्काम रहेगाव (ता. मुक्ताईनगर) येथील सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (वय ४४) याने निंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील भोकर नदीजवळ एका बाभळीच्या झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह रविवारी (ता.९) आढळून आला होता.

याबाबत निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर खिरोदा (प्र. रावेर) गावाजवळील रसलपूर आभोडा रोडवरील कमलेश नथ्थू महाजन यांच्या शेतात सुकलालची पत्नी प्यारीबाई सुकलाल चव्हाण (वय ४२) या महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला. तिनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

Death
Jalgaon News: लाल डोक्याच्या गिधाडासह अनेक दुर्मिळ प्रजाती; वन्यजीव अभ्यासकांकडून बांधवगड टायगर रिझर्वमध्ये निरीक्षण

याबाबत शेतमालक कमलेश महाजन यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील, पोलिस कर्मचारी सतिश सानप, सचिन घुगे, राहुल परदेशी यांनी धाव घेतली.

दोन दिवसांपूर्वीच गळफास

दोघेही पतीपत्नीचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव गिरी यांनी केले. दोघांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचे व गळफास घेऊन झाला, असे डॉ. गिरी यांनी सांगितले. पती, पत्नीने एकाच दिवशी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Death
Jalgaon News : प्रमुख रहदारीच्या भागातील रोहित्र उघड्यावरच; पारोळा शहरातील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com