Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Jalgaon Farmer Loan Waiver 2026 Latest Update : जळगाव जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ६५ हजारांहून अधिक कर्जखात्यांसाठी आधार प्रमाणीकरण सुरू असून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026

esakal

Updated on

जळगाव : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ८२६ कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली (Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Eligibility Maharashtra) असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६५ हजार ३४३ कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणिकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत ३५ हजार ४१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले असून ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com