
अडावद : सनपुले परिसरातील व चोपडा तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. दोन-तीन दिवसात सनपुले, वर्डी कठोरा, कुरवेल, धनवडी गरताड परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली. चोरांच्या बंदोबस्तासाठी चोपडा शहर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. सनपुले शिवारातील शेतकरी मच्छिंद्र पाटील, श्याम पाटील, अजित पाटील, आधार पाटील, वर्डी शिवारातील अमोल पाटील, आधार पाटील यांच्या सह १५/२० इतरही काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची केबलची काल शनिवारी (ता.१४) चोरी झाली. (Farmers have been affected by theft of agricultural pump cable in farm )