
गणपूर (ता. चोपडा) : मागीलवर्षी शासनाने मंजूर केलेल्या दोन हेक्टरपर्यंतच्या कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाची अद्यापही प्रतीक्षा करावी लागत आहे. महिना होऊनही अनुदानाचा एक रुपया देखील संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात असल्याने या संदर्भात कृषी विभागाने योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (Farmers in confusion waiting for subsidies for cotton soybean)