
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील मारहाण प्रकरणी चार पोलिस निलंबित
जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात कैदी वॉर्डात दाखल न्यायबंदीना थोड्याशा पैशांसाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात एक एरंडोलचा माजी नगराध्यक्ष आहे. घडलेल्या प्रकारामुळे बंदोबस्तावर तैनात चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.
कारागृहातील न्यायबंदी सतीश गायकवाड व एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन आजारपणाचे कारण करून जिल्हा रुग्णालयाच्या कैदी वॉर्डात आहेत. सोमवारी रात्री महाजन याची पत्नी त्याला भेटण्यासाठी बंदी वॉर्डात आली होती. सतीश गायकवाड याच्याही मुक्त भेटीगाठी सुरू असून, तो शौचास जाण्याच्या बहाण्याने वॉर्डातून बाहेर निघून त्याच्या टोळक्यासह रुग्णालयाच्या गच्चीवर भटकत होता.
परिणामी, गायकवाड सोबत वॉर्डात परतलेल्या दोघांनी महाजनवर टॉन्ट मारल्याने दोघांमध्ये वाद झाला. गायकवाडने फोन करून आखणी तरुणांना बोलावून घेत महाजनला बेदम झोडपून काढले. मारहाणीमुळे रुग्णालयात धावपळ उडाली. अखेर अतिरीक्त पोलिस बोलावून वाद मिटविण्यात आला होता. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या चौघांवर कारवाई
कैदी वॉर्डात बंदोबस्ताला असलेले राजेश पुरुषोत्तम कोळी, संदीप पंडितराव ठाकरे, किरण कोळी, पारस बाविस्कर या चौघांच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले असून, तत्काळ प्रभावातून त्यांना निलंबीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Web Title: Jalgaon Fight Between Two Prisoners Four Policemen Suspended
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..