Jalgaon News : परतीच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीत पाच जणांचा मृत्यू! 37 पशुधन दगावले

Latest Jalgaon News : गेल्या आठवड्यात सलग चार दिवसांत वादळी व जोरदार पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
In this way the agricultural crops are damaged.
In this way the agricultural crops are damaged.esakal
Updated on

जळगाव, ता. २९ : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. रविवारी (ता. २९) सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत होते. परतीच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीत जामनेर तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती विभागाने दिली.

गेल्या आठवड्यात सलग चार दिवसांत वादळी व जोरदार पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. कापणीस वा काढणीस आलेल्या उडीद, मूग, मका आदी हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे खरीप हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. (Five people died in natural disaster)

पावसामुळे पिकांसह वीज पडून पशुधनाची हानी झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. चार ते पाच दिवसांत अचानक जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. यामुळे शहर व परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून परिसर जलमय झाला होता. शेतशिवारात अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

कपाशीची बोंडे काळी

सप्टेंबरमध्ये कपाशीला फुले लागून कापसाची बोंडे तडकून कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असते. मात्र, अतिपावसामुळे फुले व बोंडे गळून पडू लागली आहेत. काही ठिकाणी कापसाची बोंडे काळी पडली आहेत. केळीचेही नुकसान झाले आहे, तर बऱ्याच शेतशिवारात कापणी व खुडलेल्या मक्याची कणसे पावसात भिजल्यामुळे, तसेच जमिनीतील उष्णतेमुळे कोंब येण्याची शक्यता निर्माण झाली असून, हाती आलेले उत्पादन वाया जाण्याची भीती वर्तविली जात आहे. (latest marathi news)

In this way the agricultural crops are damaged.
Nandurbar Heavy Rain: तळोद्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी! दोन दिवसांत 105 मिलिमीटरची नोंद; शेतात साचले पाणी, कपाशीला फायदा

नैसर्गिक आपत्तीत जामनेर तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, रावेर पाच आणि यावल एक, असे सहा जण जखमी झाले आहेत. शिवाय जामनेर तालुक्यात पाच, पारोळा एक, भुसावळ पंधरा, मुक्ताईनगर, भडगाव आणि यावल तालुक्यात प्रत्येकी एक अशा २४ मोठ्या, तसेच जामनेर आठ, पारोळा दोन, मुक्ताईनगर तीन अशा १३ लहान दुधाळ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

जामनेर, भुसावळ, भडगाव येथे प्रत्येकी एक, तर अमळनेर तालुक्यात दोन, अशा पाच पशुधनाची हानी झाली आहे. पावसामुळे जामनेर व पाचोरा तालुक्यात तीन कच्च्या घरांचे पूर्णत:, तर २६० कच्च्या घरांचे आणि चार पक्क्या घरांचे अंशत: नुकसानीचे पंचनामे तलाठी व मंडळ पातळीवर करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

"जिल्ह्यात मागील सप्ताहात झालेल्या जोरदार पावसामुळे कापणी झालेल्या व काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वीज पडून पशुधनाची हानी वा घरांची पडझड झाली आहे. पंचनामे करण्यात आले असून, तसा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविला आहे."- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

In this way the agricultural crops are damaged.
Jalgaon Heavy Rain Crop Damage: पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचे नुकसान! दोन दिवसांतील चित्र; सर्वाधिक नुकसान कापूस, केळीचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com