Jalgaon Sonsavali Project : ‘सोनसावली’ने होणार अन्नसाखळी सुरळीत! ‘पर्यावरण वारी’; आवार गावात 2 हजार वृक्षांचा प्रकल्प

Jalgaon News : पर्यावरणवारीत संपूर्ण गावातून पाणी जमा करून अमृत कलश भरण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सोबत आणलेल्या पाण्याने अमृत कलश भरून कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले.
Tree Plantation
Tree Plantationesakal

जळगाव : तालुक्यातील आवार गावात माय माती फाउंडेशन संचालित सोनसावली प्रकल्पांतर्गत बुधवारी (ता. ५) पर्यावरण दिनानिमित्त ‘पर्यावरण वारी’ कार्यक्रम झाला. आवार ग्रामपंचायतीच्या १०० गुंठे जागेवर २ हजारांवर झाडांचे घनदाट जंगल साकारण्यात येत आहे. त्यास सोनसावली प्रकल्प नाव देण्यात आलेय.

पर्यावरणवारीत संपूर्ण गावातून पाणी जमा करून अमृत कलश भरण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सोबत आणलेल्या पाण्याने अमृत कलश भरून कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. गावातील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रगती सपकाळे, यशश्री सोनवणे, जागृती चौधरी, देविदास कोळी या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. (Jalgaon Sonsavali project)

डॉ. उषा शर्मा, छाया पाटील, सुजाता देशपांडे, वैदेही नाखरे, प्रियल जैन, सीए गौरव जैन, गायत्री फिरके, सीए वीरेंद्र फिरके, अनिता कांकरिया, लता बनवट, ॲड. रेश्मा बेहरानी, अर्चना जाखेटे, पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ, कविता नेमाडे, अनिता दलाल, स्मिता वडनेरे, भानुदास जोशी, किशोर पाटील, केतन पाटील, शेखर हनवदे, मिलिंद पाटील, विशाल अलकारी आदी या उपक्रमात सहभागी झाले.

अन्नसाखळी सुरळीत होणार

माय माती फाउंडेशन आणि आवार ग्रामपंचायतीतर्फे सोनसावली प्रकल्प ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वीरित्या साकारला जात आहे. ‘सोनसावली’मुळे तुटलेली अन्नसाखळी पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत होत आहे व आजूबाजूच्या गावांमध्ये यामुळे पर्यावरणाप्रती जनजागृती होऊन अशाप्रकारचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा पाहुण्यांनी व्यक्त केली. (latest marathi news)

Tree Plantation
Latest Marathi Live Latest News : पंतप्रधान मोदींमुळेच आंध्र प्रदेशात आम्ही निवडणूक जिंकली - टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू

यानंतर अमृत कलश व वृक्ष घेऊन ग्रामपंचायत कार्यालयापासून वारी सुरू झाली आणि ‘सोनसावली’मध्ये आलेल्या पाहुण्यांनी आणि ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून एकात्मतेचे प्रतीक असलेले अमृत कलशमधील जल झाडांना अर्पण केले.

आवार गावचे सरपंच संजय सपकाळे, सुनील सपकाळे, पांडुरंग सोनवणे, महिला बचतगट तसेच सर्व ग्रामस्थ, मायमती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्राम पाटील, वत्सला पाटील, सुहास पाटील, प्रभावती पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Tree Plantation
Jalgaon Chopada Vidhan Sabha : रावेर लोकसभेत सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदारसंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com