
Jalgaon Pola Festival : आदिवासी पारंपरिक देवदानी होळी नृत्य.. शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट.. संबळ वाद्यावर सालदारांचे नृत्य.. सनई-चौघाड्यांच्या वाद्यासह.. सर्जा-राजा म्हणजे कृषीसंस्कृतीत मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक ही जैन हिल्सवरील पोळाचे पारंपारिक महत्त्व अधोरेखित करीत होती.
या पोळा उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह भुमिपुत्रांनी ठेका धरला. वृषभ राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (foreign nationals participated unique pola festival on Jain Hills)