Jalgaon Girish Mahajan : गिरीश महाजनांची माजी खासदार पाटलांशी ‘गुफ्तगू’

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.
Bharatiya Janata Party leader, minister Girish Mahajan, former MP A. T. Patil with Officials
Bharatiya Janata Party leader, minister Girish Mahajan, former MP A. T. Patil with Officials esakal

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाराज झालेले उन्मेश पाटील यांनी भाजपला ‘रामराम’ करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर भाजपचे युवानेते व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. (Jalgaon Former MP A T Patil met BJP leader Girish Mahajan and discussed)

त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपत इच्छुकांनी पुन्हा हालचाली सुरू केल्यात. त्यात गुरुवारी (ता. ४) माजी खासदार ए. टी. पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेत भाजप कार्यालयातच बंद दाराआड चर्चा केल्यामुळे उमेदवारीबाबत पुन्हा एकता उत्सुकता निर्माण झाली आहे.

अन्य इच्छुक झाले सक्रिय

भाजपमधील नाराज खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांनी पक्षाला ‘रामराम’ केल्यामुळे खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या होत्या. जिल्हा दूध संघाचे संचालक जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, माजी खासदार ए. टी. पाटील इच्छुक होते. माजी खासदार पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत तळ ठोकून आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते.

आता पुन्हा ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी गुरुवारी मंत्री गिरीश महाजन यांची जळगावच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली. दोघांनी बंद दाराआड चर्चाही केली. त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी श्री. महाजन व पदाधिकाऱ्यांबारोबर फोटोही काढले. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेदवारी कापण्याची पाश्‍र्वभूमी

विरोधी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पवार यांची उमेदवारी जाहीर होताच पक्षात उडालेली खळबळ लक्षात घेऊन ए. टी. पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ते पक्षातर्फे अद्याप इच्छुक आहेत. (jalgaon political news)

Bharatiya Janata Party leader, minister Girish Mahajan, former MP A. T. Patil with Officials
Jalgaon Unmesh Patil : दहशत, द्वेषाचे राजकारण खपवून घेणार नाही : उन्मेश पाटील

आपण आजच्या परिस्थितीत कसे सक्षम उमेदवार आहोत, हेही त्यांनी दिल्लीतील वरिष्ठ व मंत्री महाजन यांना पटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ पक्षाने त्यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर स्मिता वाघ यांचीही उमेदवारी रद्द करून उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली होती. आता उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज उन्मेश पाटील भाजपतून बाहेर पडले आहेत.

उमेदवार बदलणार नाही

पक्षाच्या नेत्यांनी जळगाव व रावेर दोन्ही ठिकाणची उमेदवार बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, माजी खासदार उन्मेश पाटील व गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे या चर्चेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

पत्रकारांशी बोलताना ए. टी. पाटील यांनी आपली केवळ निवडणूक प्रचाराबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी उमेदवारीबाबत कोणतेही विधान केले नाही. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Bharatiya Janata Party leader, minister Girish Mahajan, former MP A. T. Patil with Officials
Jalgaon News : कॉंग्रेसने पदे वाचविण्यासाठी संविधानात केला बदल : आमदार संजय सावकारे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com