
जळगाव : दूध संघावर निवडून आल्यानंतर एक वर्षात दूध संघाच्या कारभारात बदल झाला नाही तर राजीनामा देण्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली होती. मात्र सध्या जिल्हा दूध संघात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. याबाबत पालकमंत्र्यांच्या बोलण्यातून उघडपणे दिसून आले आहे. यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या संचालक पदाचा राजीनामा देतील का? असा सवाल माजी खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. (Former MP Unmesh Patil question over malpractice in milk union)