Jalgaon Unseasonal rain Damage : अमळनेरला पावणे चारहजार हेक्टरला फटका; भरपाईची मागणी

Jalgaon Unseasonal rain Damage : तालुक्यात सोमवारी (ता. २६) झालेल्या वादळासह गारपिटीचा ६५ गावांमधील ३ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाला मोठा फटका बसला.
Crop damage due to unseasonal rains.
Crop damage due to unseasonal rains.esakal

Jalgaon Unseasonal rain Damage : तालुक्यात सोमवारी (ता. २६) झालेल्या वादळासह गारपिटीचा ६५ गावांमधील ३ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाला मोठा फटका बसला. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत विषय मांडून तातडीने पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.

सोमवारी (ता.२६) रात्री अचानक वादळ व गारपीट झाल्याने गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, लिंबू, आंबा आदी पिकांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Four thousand hectares of Amalner was extensively damaged)

अनेक ठिकाणी वादळामुळे पिके झोपल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष रिटा बाविस्कर, एल. टी. पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकूळ बोरसे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भागवत सूर्यवंशी, गिरीश पाटील, इघन पाटील.

शिवाजी पाटील, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, धनगर पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील, पातोंडा सोसायटीचे चेअरमन सुनील पवार, जितेंद्र पवार, राहुल पवार, राहुल लांबोळे, हर्षल पवार, संजय पवार, दीपक पवार, भोजराज पाटील, अण्णा पाटील, आर. डी. पवार, जयवंतराव पवार. (Latest Marathi News)

Crop damage due to unseasonal rains.
Jalgaon News : जळगाव बाजार समितीतील 5 कोटींचे व्यवहार ठप्प

भरत बिरारी, विजय पवार, भूषण पवार, पांडुरंग बोरसे, अनंत निकम यांनी तहसील कार्यालयावर शिष्टमंडळ नेऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शासनाने तातडीने मदतीचा अध्यादेश काढावा अन्यथा महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

असे झाले नुकसान

अमळनेर तालुक्यात ६५ गावांत २ हजार ५३८ शेतकऱ्यांचा १ हजार ९५ हेक्टर मका, ९३६ हेक्टर हरभरा, ९११ हेक्टर ज्वारी, ५३४ हेक्टर गहू, १२ हेक्टर बाजरी, १५ हेक्टर तीळ, १८५ हेक्टर इतर पिके, १३ हेक्टर भाजीपाला, १९ हेक्टर फळपिके असे ३ हजार ७२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक पेरा लावलेला नाही. त्यामुळे नोंदीत शेतकऱ्यांचे शेत रिकामे दिसत आहे.

Crop damage due to unseasonal rains.
Jalgaon Unseasonal rain Damage : नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com